-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
अंधेरी पश्चिम येथील आंबोली स्मशानभूमी (Cemetery) मागील डिसेंबर २०२४ पासून तात्पुरत्या स्वरुपात बंद असून येथील नागरिकांना वर्सोवा आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत पारंपारिक दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जावे लागत आहे. अखेर या स्मशानभूमीच्या पारंपारिक दाहिनीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याने येथील नागरिकांना अंत्यविधीकरता होणारा त्रास कमी होणार आहे.
अंधेरी पश्चिम येथील सिजर मार्गावरील आंबोली हिंदू स्मशानभूमीचे (Cemetery) बांधकाम जुने झाल्याने संरचनात्मक सल्लागार बी. जे. मेहता आर्किटक्चरल आणि स्क्ट्रक्चरल कन्सलटंट यांच्या लेखा परिक्षक अहवालाच्या अनुषंगाने या स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार डिसेंबर २०२४ पासून दुरुस्तीच्या कामांसाठी आंबोली हिंदू स्मशानभूमीतील पारंपरिक दहनकक्षाची सेवा रविवारी १ डिसेंबर २०२४ पासून बंद ठेवण्यात आली होती. दुरुस्तीची ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे दहन कक्ष पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रशासनाच्यावतीने कळण्यात आले होते. त्यामुळे येथील स्थानिकांना वेसावे (वर्सोवा) हिंदू स्मशानभूमी आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत पारंपरिक दाहिनीवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे.
(हेही वाचा – अवैध खाणकामाकरिता पदयात्रा काढली, पण मुख्यमंत्री होताच पडला विसर; CM Siddaramaiah यांना मंत्र्याने दिला घरचा आहेर)
मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामांला सुरुवात न झाल्याने काही विकासकासाठी महापालिका येथील पारंपारिक दाहिनीची सेवा बंद करत असल्याचे आरोप स्थानिकांकडून होत होते. परंतु आता खऱ्या अर्थाने या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाणार असून सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामासाठी महापालिकेच्यावतीने शाह इन्फ्रा डेव्हलपमेंट्स या कंपनीची निवड केली आहे. त्यानुसारच लवकरच येथील कामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अंबोली स्मशानभूमीत (Cemetery) पारंपारिक दाहिनीची सेवा बंद ठेवण्यात आली असली तरी नैसर्गिक वायू दाहिनी पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत असल्याने काही ठराविक नागरिकांनाच याठिकाणी अंत्यविधी करता येत आहे, परंतु ज्यांना पारंपारिक दाहिनीवर अंत्यविधी करायचे आहे, त्यांना मात्र वर्सोवा आणि ओशिवरा स्मशानभूमीत लांब जावे लागत असल्याने या स्मशानभूमीची दुरुस्ती केव्हा होणार असा प्रश्न नागरिकांकडून केला जात होता.
(हेही वाचा – मुंबईत १२ वर्षांत ७२ हजार जणांचा Railway Accident मध्ये मृत्यू)
दुरुस्तीच्या कामांमध्ये कशाचा आहे सामावेश?
- कंपाऊंड भिंती आणि त्यावरील दुरुस्तीचे काम.
- लाकूड वखार, शिव मंदिर, डि आर के आणि प्रार्थना सभागृहाची दुरुस्तीची कामे.
- पायर्स शेडच्या पुनर्रचनेची कामे आणि त्यांच्या छतावरील पत्रे बसवणे.
- विधी प्लॅटफॉर्म, सुरक्षा कक्ष, मीटर रुम यांच्या पुनर्रचनेची कामे.
- मुख्य प्रवेशद्वाराचे काम.
- आवारातील पेव्हरब्लॉक बसवणे.
- नळकामे आणि स्वच्छता कामे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

