Operation Sindhu: भारत इराणमधून नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांनाही परत आणणार; आतापर्यंत ८२७ जणांची घरवापसी

156
भारत सरकारच्या ऑपरेशन सिंधू (Operation Sindhu) अंतर्गत, इराणमध्ये अडकलेल्या 310 भारतीय नागरिकांना घेऊन आणखी एक विमान शनिवारी (21 जून) संध्याकाळी दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) पोहोचले. ऑपरेशन सिंधू अंतर्गत, भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे विमान शनिवारी संध्याकाळी इराणच्या मशहद येथून निघाले. यानंतर, विमान भारतीय वेळेनुसार शनिवारी (21 जून) दुपारी 4.30 वाजता दिल्ली विमानतळावर उतरले. (Operation Sindhu)

(हेही वाचा – तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग व पवित्र Pandharpur Wari यांचा अवमान सहन करणार नाही; वारकरी संघटना आणि हिंदुत्वनिष्ठांचा इशारा)

इराणमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेपाळ आणि श्रीलंका सरकारच्या विनंतीनुसार, ऑपरेशन सिंधू अंतर्गत या देशांच्या नागरिकांनाही भारतात आणले जाईल. नेपाळच्या परराष्ट्र मंत्री डॉ. आरजू राणा देऊबा यांनी या मदतीबद्दल भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, हे भारत आणि नेपाळमधील मजबूत संबंधांचे एक मोठे उदाहरण आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी केली पोस्ट शेअर
भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीनंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी शनिवारी (२१ जून) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट शेअर केली. जयस्वाल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये इराणमधून परतलेल्या भारतीय नागरिकांचे काही फोटो शेअर केले. भारतात पोहोचल्यानंतर सर्व लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि दिलासा स्पष्टपणे दिसत होता.
या पोस्टमध्ये जयस्वाल यांनी लिहिले आहे की, “इराणच्या मशहाद येथून ३१० भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे आणखी एक विमान २१ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता नवी दिल्लीला पोहोचले आहे.” त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आतापर्यंत ऑपरेशन सिंधू अंतर्गत एकूण ८२७ भारतीय नागरिक सुरक्षितपणे भारतात परतले आहेत.
५१७ भारतीय नागरिक दुसऱ्या विमानाने भारतात पोहोचले
त्याच वेळी, ऑपरेशन सिंधू अंतर्गत, तुर्कमेनिस्तानमधील अश्गाबात येथून आणखी एक विमान शनिवारी (२१ जून) पहाटे ३ वाजता ५१७ भारतीय नागरिकांना घेऊन नवी दिल्लीत दाखल झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या घरी सुरक्षितपणे परत आणले जात आहे.

(हेही वाचा – Shah Rukh Khan Mannat Bungalow नुतनीकरणात सीआरझेडचे उल्लंघन? वन विभागासह पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली संयुक्त पाहणी)

…म्हणून ऑपरेशन सिंधू ‘ सुरू केले
मध्य पूर्वेतील तणाव आणि इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान दोन्ही देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी भारत सरकारने बुधवारी (१८ जून २०२५) ऑपरेशन सिंधू सुरू केले. या मोहिमेअंतर्गत, ११० भारतीय नागरिकांची पहिली तुकडी इराणमधून सुरक्षितपणे भारतात पोहोचली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.