वर्धापन दिनीच Shiv Sena UBT ला जोरदार धक्का; मुंबई, ठाणे, गोव्यातून अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

92
वर्धापन दिनीच Shiv Sena UBT ला जोरदार धक्का; मुंबई, ठाणे, गोव्यातून अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
  • प्रतिनिधी 

शिवसेनेच्या वर्धापन दिनीच शिवसेना उबाठाला (Shiv Sena UBT) मोठा हादरा बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबईतील तीन माजी नगरसेवक, ठाणे आणि गोवा राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे वर्धापन दिनाच्या दिवशीच शिवसेनेला राजकीय ताकदीचा मोठा बूस्टर मिळाला आहे. गुरुवारी ठाण्यातील मातोश्री स्व. गंगूबाई संभाजी शिंदे सभागृहात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. आमदार दिलीप लांडे, शिवसेना सचिव राम रेपाळे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

मुंबईतील तीन माजी नगरसेवक शिवसेनेत

शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) माजी विभागप्रमुख अजित भंडारी, शाखाप्रमुख संजय जंगम, माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे (प्रभाग क्र.१६१) यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करत शिवसेना उबाठाला घरातच धक्का दिला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या नगरसेविका नादिया शेख, युवासेना सचिव मोहसीन शेख यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

(हेही वाचा – राज्यातील 11 महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या भूसंपादनाचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे स्पष्ट आदेश)

गोव्यातही शिवसेना उबाठाला धक्का

गोवा राज्यातील शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) माजी राज्यप्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेसचे माजी महासचिव काशिनाथ मयेकर, पाच तालुकाप्रमुख, एक शहरप्रमुख, विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण स्वीकारत शक्तिप्रदर्शन केलं.

ठाण्यातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

ठाण्यातील रामचंद्रनगर शाखेतील उपविभागप्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रविण बामणे यांच्यासह अनेक उपशाखाप्रमुख, गटप्रमुखांनी देखील पक्षप्रवेश केला.

(हेही वाचा – Iran-Israel War : इराणमधील अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्याचा इस्त्रायली सैन्याचा दावा)

“तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “तुम्ही दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. तुमच्या प्रभागातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. आमची शिवसेना ही ‘जनतेची सेना’ आहे.” या राजकीय घडामोडींमुळे, शिवसेना पुन्हा एकदा मुंबई, ठाणे आणि गोवा परिसरात ताकद वाढवत असून, शिवसेना उबाठासाठी (Shiv Sena UBT) हा धक्का धोक्याचा इशारा मानला जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.