महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण (Maharashtra SSC, HSC 2025 Result ) बोर्डाकडून (MSBSHSE) लवकरच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल 2025 घोषित केला जाणार आहे. जवळपास 30 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. यावर्षी दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च आणि बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी पासून 18 मार्चपर्यंत पार पडली. दरम्यान, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahahssboard.in आणि https://mahresult.nic.in/ वर आपली प्रोव्हिजनल मार्कशीट चेक करू शकतात. (Maharashtra SSC, HSC 2025 Result )
हेही वाचा-India-Pakistan War : पाकिस्तानी राजदूताची भारतावर अणुहल्ल्याची धमकी ; पाकच्या पोकळ धमक्या सुरूच …
येत्या 15 मे पर्यंत दोन्ही परिक्षांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती समोर येत आहे. 5 ते 10 जून दरम्यान दहावीचा निकाल, तर 15 मे पर्यंत बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, बोर्डाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाकडून एक पत्रकार परिषद देखील घेतली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा निकालाची वेळ आणि तारीख जाहीर केली जाईल. (Maharashtra SSC, HSC 2025 Result )
राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने परीक्षांचे आयोजन लवकर केले आणि या परीक्षांचा निकालही मे महिन्यातच जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर जुलैच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर एसससी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र अद्याप मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. (Maharashtra SSC, HSC 2025 Result )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community