नकली सेना म्हणणाऱ्यांना मी सोडणार नाही; Uddhav Thackeray यांचा इशारा

165
उद्धव ठाकरे म्हणाले, नकली सेना बोलल्यानंतर मी त्यांना सोडतो असं वाटल का? 48 पैकी 42 खासदार निवडून देण्याची गंमत आहे का? आता शिवसेना तुमच्या सोबत नाही. त्या तक्तापर्यंत तुम्हाला पोहोचू देणार नाही. मोदीजी तुम्हाला देशाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना नकोय, असा इशारा उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला.
सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ठाकरेंनी पुन्हा एका मोदी-शहांवर निशाणा साधला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील पुन्हा टरबूज म्हणून हिनवले. अटलजींचा आत्मा तिकडे रडत असेल. कोणाकडे आज भारतीय जनता पार्टी गेली, म्हणत असतील. मराठा आरक्षण बाबतीत तुम्ही निर्णय का घेतला नाही हे तुम्ही उद्याच्या सभेत सांगा. लोकांच्या मनात हीच भीती आहे की तुम्ही घटना बदलणार आहात, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

महाराष्ट्राच्या साध्या माणसाने लिहिलेली घटना मोदीजी तुम्ही बदलायला निघालेला आहात. भाजपात हिंमत असेल तर ज्या घटनेवर तुम्ही हात ठेवून शपथ घेतला. घटनेवरती हात ठेवून पाहा पूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही. यांना घटना का बदलायचे आहे ? कारण यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल आकास आहे. म्हणून महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, असेही ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.