संभाजी ब्रिगेडच्या शेकडो आजी – माजी कार्यकर्त्यांनी गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन देत देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
(हेही वाचा – Satyapal Malik यांच्या घरासह ३० ठिकाणी सीबीआयची धाड)
आमदार अमोल मिटकरी यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न –
संभाजी ब्रिगेड संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ajit Pawar) सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार मानत अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
आक्रमकपणा योग्यठिकाणी वापरून आपल्याला जनहिताची कामे करायची आहेत – अजित पवार
संभाजी ब्रिगेड संघटनेची ओळख ही ‘विचारांसाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना’ अशी आहे. हा आक्रमकपणा योग्यठिकाणी वापरून त्यातून जनहिताची कामे आपल्याला करायची असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी हा ‘शिव – फुले – शाहू – आंबेडकर’ यांची विचारधारा पुढे नेणारा पक्ष –
राष्ट्रवादी काँग्रेस ही आज महायुतीसोबत सत्तेत सहभागी असली तरी शिव – फुले – शाहू – आंबेडकर यांची बहुजनवादी विचारधारा पुढे घेऊन जात असल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी एकत्रित काम करायचे आहे. यासाठी एकमेकांना निश्चित मदत करू असा विश्वास अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – Ind vs Eng Ranchi Test Preview : भारताला मालिका जिंकण्याची संधी, तर इंग्लंडचा बरोबरीचा अखेरचा प्रयत्न)
या पक्षप्रवेश सोहळ्याला क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, तसेच संभाजी ब्रिगेड संघटनेचे मान्यवर उपस्थित होते. (Ajit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community