Blackmailing Case : हॉटेल व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून १५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सेक्रेटरीला अटक

निकिता श्याम दुधीच उर्फ किमया कपूर असे अटक करण्यात आलेल्या सेक्रेटरीचे नाव आहे. किमया कपूर हिने यापूर्वी अनेकांना ब्लॅकमेल केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती आंबोली पोलिसांनी दिली आहे.

144
Online Beating च्या नादात बँक मॅनेजरनेच लुटली स्वतःची बँक; ३ कोटींचे सोने गायब

पर्सनल सेक्रेटरी म्हणून कामावर ठेवलेल्या तरुणीने हॉटेल व्यावसायिक (Hotel businessman) असलेल्या मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन १५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार पश्चिम उपनगरातील आंबोली येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात (Amboli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून सेक्रेटरी असलेल्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. (Secretary Arrested)

निकिता श्याम दुधीच उर्फ किमया कपूर (Accuse Nikita @kimya kapoor Arrested) असे अटक करण्यात आलेल्या सेक्रेटरीचे नाव आहे. किमया कपूर (Accuse Nikita @kimya kapoor Arrested) हिने यापूर्वी अनेकांना ब्लॅकमेल (Blackmailing Case) केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती आंबोली पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा हॉटेल व्यावसायिक (Adheri Hotel businessman) यांचे अंधेरी येथे हॉटेलचा व्यवसाय आहे. निकिता ही त्याच्याकडे पर्सनल सेक्रेटरीच्या कामासाठी आली होती. हॉटेल व्यावसायिकाने तीला कामावर ठेवून घेतले होते, दरम्यान, तिने त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. (Blackmailing Case)

(हेही वाचा – Ind vs Eng Ranchi Test Preview : भारताला मालिका जिंकण्याची संधी, तर इंग्लंडचा बरोबरीचा अखेरचा प्रयत्न)

अनेकांना ब्लॅकमेल करुन पैसे काढले असण्याची शक्यता

मालकासोबत जवळीक निर्माण झाल्यानंतर तिने विविध बहाण्याने त्याच्याकडून पंधरा लाख रुपये उकळले. जानेवारी महिन्यात निकिता उर्फ किमयाने मालकाला काही निमित्ताने घरी बोलावून चहामध्ये गुंगीचे औषध दिले. व्यावसायिकाला गुंगी येताच निकिता उर्फ किमयाने त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे व्हिडीओ मोबाईलवर बनवून ती त्यांना ब्लॅकमेल करू लागली. निकिता उर्फ किमयाने मालकाकडे १५ कोटी रुपयांची मागणी केली अन्यथा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तसेच त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना व्हायरल करून बदनामी करू, अशी धमकी तिने दिली होती. तिच्या धमकीला घाबरून व्यावसायिकाने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून सेक्रेटरी निकिता उर्फ किमया कपूरला अटक केली आहे. (Parsnol Secretary Nikita @kimya kapoor Arrested) किमया कपूरने यापूर्वी देखील अनेकांना ब्लॅकमेल करुन पैसे काढले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या अनुषंगाने तपास सुरु आहे. (Blackmailing Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.