खास थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक शिमला, कुलू, मनाली ते जम्मू कश्मीर पर्यंतचा प्रवास करतात. मात्र गेले आठ दिवस या थंडीची मजा दिल्लीकर घरातच अनुभवत आहेत. प्रचंड कडाक्याची थंडी आणि धुक्याचे साम्राज्य असल्यामुळे हिल स्टेशनला असल्याचा अनुभव दिल्लीकरांना येतोय. अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत धुकेच धुके दिसत आहेत. शिवाय कडाक्याची थंडी असल्यामुळे नियमित कामकाज करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे शाळांना थंडीच्या सुट्ट्या दिल्ली सरकारने जाहीर केल्या असल्या तरी मोठ्यांना कडाक्याच्या थंडीत दैनंदिन कार्यालयीन कामकाज करण्यासाठी बाहेर पडावे लागते. यामुळे दिवसाही गाडीचे लाईट सुरु ठेऊन गाडी चालवावी लागत आहे. (Delhi Winter)
आणखी दोन दिवस पावसाची शक्यता
थंडीच्या लाटेचा परिणाम पंजाबसह संपूर्ण उत्तर भारतात दिसून येत आहे. डिसेंबरमध्ये पाऊस नसल्यामुळे जानेवारीची सुरुवातही धुक्याने झाली असून, ती ६ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. शुक्रवारी हवामान खात्याने १५ जिल्ह्यांमध्ये स्मॉगसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य राज्यांमध्ये पावसामुळे थंडी वाढली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, छत्तीसगड, बिहार आणि झारखंडमध्येही तुरळक पाऊस पडू शकतो. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह ६ राज्यांमध्ये कोल्ड डे अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानच्या माउंट अबूमध्ये किमान पारा गोठवण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सीकरमध्ये १.० अंश सेल्सिअस आणि फतेहपूरमध्ये २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (Delhi Winter)
(हेही वाचा – Shortest Test Match : १८८२ पासून २०२४ पर्यंत दोन दिवसांच्या आत संपलेले कसोटी सामने)
दिल्लीहून २२ ट्रेन उशिराने
पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश, यूपीसह १५ राज्यांमध्ये धुके आहे. या राज्यांमध्ये ६ जानेवारीलाही हीच स्थिती राहू शकते. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागाने राज्यातील माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल केला आहे. शाळा आता सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचवेळी, जयपूर, राजस्थानमध्ये, सरकारी आणि खाजगी शाळांमधील इयत्ता ८ वी पर्यंतच्या हिवाळी सुट्ट्या १३ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. सीकरमध्येही १५ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. त्याचवेळी धुक्यामुळे दिल्लीहून २२ ट्रेन उशिराने धावत आहेत. (Delhi Winter)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community