David Warner Baggy Green : डेव्हिड वॉर्नरची बॅगी ग्रिन कॅप कशी मिळाली?

ऑस्ट्रेलियन जर्सी बरोबर येणारी बॅगी ग्रिन टोपी हरवल्यामुळे वॉर्नर मागचे काही दिवस बेचैन होता. 

160
David Warner : डेव्हिड वॉर्नरची विराट कोहली आणि रॉस टेलरच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
David Warner : डेव्हिड वॉर्नरची विराट कोहली आणि रॉस टेलरच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियन जर्सी बरोबर येणारी बॅगी ग्रिन टोपी (Baggy Green cap) हरवल्यामुळे वॉर्नर मागचे काही दिवस बेचैन होता. (David Warner Baggy Green)

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) मागचे काही दिवस बेचैन होता. आपल्या शेवटच्या कसोटी मालिकेत घातलेली बॅगी ग्रिन टोपी (Baggy Green cap) नेमकी तो सिडनी ते मेलबर्न प्रवासात कुठे तरी हरवून बसला होता. त्यामुळे मेलबर्नला पोहोचल्यावर वॉर्नरने सोशल मीडियावरून भावपूर्ण आवाहन केलं होतं, त्याची टोपी कुणाला मिळाली तर ती परत देण्याचं. खेळाडूंसाठी संघाची राष्ट्रीय जर्सी आणि टोपी या सन्मानाच्या गोष्टी असतात. त्यात ३७ वर्षीय वॉर्नरची ही कारकीर्दीतील अखेरची मालिका आहे. (David Warner Baggy Green)

(हेही वाचा – Shortest Test Match : १८८२ पासून २०२४ पर्यंत दोन दिवसांच्या आत संपलेले कसोटी सामने)

पण, विशेष म्हणजे वॉर्नरच्या (David Warner) भावपूर्ण आवाहनाला त्याच्या सिडनीतील हॉटेल कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला. वॉर्नर आपली टोपी सिडनीच्या हॉटेलमध्ये विसरला होता आणि तिथून त्याला ती परत मिळाली. ही बातमीही मग वॉर्नरने उत्साहाने सोशल मीडियावर शेअर केली. (David Warner Baggy Green)

‘आता मला जरा शांत वाटतंय आणि आनंदही झालाय. देशासाठी क्रिकेट खेळलेला माणूसच सांगू शकेल, संघाची टोपी किती महत्त्वाची असते ते. आता ही टोपी उर्वरित आयुष्यात माझ्यासाठी मोठी ठेव असणार आहे,’ असं इन्स्टाग्रामवरील संदेशात वॉर्नरने म्हटलं आहे. (David Warner Baggy Green)

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

(हेही वाचा – Ministry of External Affairs : कतारमधील आठ माजी नौसैनिकांच्या शिक्षेविरोधात भारत करणार याचिका)
बॅगी ग्रिन कॅप म्हणजे काय?

बॅगी ग्रिन हा ऑस्ट्रेलियन संघाच्या अधिकृत टोपीचा रंग आहे. त्यामुळे तिला नुसतंच बॅगी ग्रिन असंही म्हटलं जातं. एखादा खेळाडू ऑस्ट्रेलियन कसोटी संघात पदार्पण करतो, तेव्हा संघातील ज्येष्ठ खेळाडूच्या हस्ते नवीन खेळाडूला सामन्यापूर्वी सकाळी बॅगी ग्रिन कॅप बहाल केली जाते. तशी परंपरा ऑस्ट्रेलियन संघातच सुरू झाली. ही टोपी त्यामुळे खेळाडूसाठी सन्मानाची आणि तितकीच संवेदनशील गोष्ट आहे. (David Warner Baggy Green)

शेन वॉर्नचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बॅगी ग्रिन कॅपचा दानधर्मासाठी लिलाव करण्यात आला होता. त्या टोपीला जवळ जवळ ७ लाख अमेरिकन डॉलर इतके पैसे मिळाले होते. असं या बॅगी ग्रिन कॅपचं महत्त्व आहे. आताही वॉर्नरने टोपी हरवल्याचं जाहीर केल्यावर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी एल्बनीज (Australian PM Anthony Albanese) यांनी वॉर्नरच्या समर्थनार्थ कुणाला ती टोपी मिळाल्यास ती वॉर्नरला परत करण्याचं आवाहन केलं होतं. (David Warner Baggy Green)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.