Honda Rebel 1100 : होंडा रिबेल ११०० चं भारतात दमदार आगमन

नवीन वर्षी होंडा कंपनी आपला फ्लॅगशिप रिबेल ब्रँड भारतात आणण्याच्या तयारीत आहे. 

222
Honda Rebel 1100 : होंडा रिबेल ११०० चं भारतात दमदार आगमन
Honda Rebel 1100 : होंडा रिबेल ११०० चं भारतात दमदार आगमन
  • ऋजुता लुकतुके

नवीन वर्षी होंडा कंपनी आपला फ्लॅगशिप रिबेल ब्रँड भारतात आणण्याच्या तयारीत आहे.

होंडा रिबेल हा ब्रँड क्रूझर बाईकच्या क्षेत्रात नवीन नाही. कंपनीने पद्धतशीरपणे ही बाईक आधी युके आणि युरोपीयन बाजारपेठ आणि मग २०२१ मध्ये थायलंडच्या निमित्ताने आशियाई बाजारपेठेतही जोरदार धडक दिली आहे. सुरुवातीच्या यशानंतर होंडाने वेळोवेळी या मॉडेलमध्ये बदल केले आणि तरुणाईला पकडून ठेवण्यात यश मिळवलं. आता कंपनी रिबेल सीएनएक्स ११०० आणि रिबेल सीएनएक्स ११००टी या दोन जुन्याच बाईक नवीन रंगात बाजारात आणत आहे. कंपनीने जाणीवपूर्वक घेतलेला हा निर्णय आहे. कारण, युकेमध्ये कंपनीची ही चाल यशस्वी ठरलीय.

तरुणाईला आकर्षित करणारा ह्यू ब्लू आणि रस्ट राखाडी हे यातले नवीन रंग आहेत. अद्ययावत आणि सुसज्ज अशी ही होंडाची बाईक आता भारतात प्रवेश करण्यासाठी तयार झाली आहे.

(हेही वाचा – Jammu-Kashmir: अखनूरच्या आयबी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव लष्कराच्या सतर्कतेमुळे फसला)

बाईकचा डिस्प्ले डिजिटल आहे. इंजिनची क्षमता १०८४ सीसी इतकी आहे. इंधनची टाकी १३.६ लीटरची आहे. तर ६ स्पीडचा गिअरबॉक्स आहे. गाडीला डिजिटल घड्याळ आहे, सेल्फ स्टार्ट आहे. तसंच एबीएस प्रणालीही अद्ययावत आहे. गाडीची स्पर्धा अर्थातच हार्ले डेव्हिडसन आणि इतर भारतीय बाईकशी आहे.

आणि या बाईकची किंमत १२,००० रुपयांपासून असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.