Jammu-Kashmir: अखनूरच्या आयबी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव लष्कराच्या सतर्कतेमुळे फसला

लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली.

104
Jammu-Kashmir: अखनूरच्या आयबी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव लष्कराच्या सतर्कतेमुळे फसला
Jammu-Kashmir: अखनूरच्या आयबी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव लष्कराच्या सतर्कतेमुळे फसला

जम्मू-कश्मीरमधील (Jammu-Kashmir) अखनूर सेक्टरमधून ४ दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा डाव लष्कराने उधळून लावला. हे दहशतवादी घुसखोरी करत असल्याचा सुगावा लागताच लष्कराने दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात १ दहशतवादी ठार झाला.

खौर, अखनूरच्या आयबी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दहशतवाद्यांचा हा डाव सतर्क जवानांनी उधळून लावला. लष्कराने हल्ला सुरू केल्याने दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडले. २२ आणि २३ डिसेंबरच्या मध्यरात्री पाकिस्तानच्या संलग्न सीमेवर ४ दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली सीमेवरील उपकरणांमध्ये कैद झाल्या. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. यात १ दहशतवादी ठार झाला. त्याचा मृतदेह फरफटत नेऊन इतर ३ दहशतवादी सीमा पार करून पळून गेले, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली, पुढील सुनावणी २४ जानेवारीला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.