विक्रोळी (Vikhroli) एलबीएस मार्गावर शुक्रवारी रात्री एका महिला कॉन्स्टेबलची एका धार्मिक जुलूस मधील काही टवाळखोरांनी छेड काढल्याचा संतापजनक प्रकार विक्रोळी पश्चिम एलबीएस रोड या ठिकाणी शुक्रवारी रात्री घडला. या संतापजनक घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पार्कसाईड पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेत कुठल्याही धार्मिक जुलूसचा काही संबंध नसून घटना घडली त्यावेळी हा जुलूस घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर होता अशी माहिती पार्कसाईड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी दिली. (Vikhroli Police Station)
पीडित महिला ही मुंबई पोलीस दलाच्या सशस्त्र विभागात कॉन्स्टेबल या पदावर तैनात आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महिला कॉन्स्टेबल साध्या वेशात आणि काही तरुणी जेवणासाठी बाहेर निघाल्या होत्या. दरम्यान एलबीएस रोड, सिप्ला कंपनीजवळ काही टवाळखोर तरुणांनी महिला कॉन्स्टेबलची (woman police constable) छेड काढली. या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलने तात्काळ पार्कसाईड पोलीस ठाण्यात (Parksite Police Station) धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तक्रारीची दखल घेऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला करून आरोपीला अटक करण्यासाठी ६ पथके तयार करून आरोपीच्या मागावर पाठविण्यात आले असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Vikhroli Police Station)
(हेही वाचा – Mumbai Water : मुंबईकरांसाठी पाण्याचा फुल स्टॉक : वर्षभराची तहान भागणार)
मात्र ही छेड शुक्रवारी रात्री घाटकोपरच्या दिशेने निघालेल्या एका धार्मिक जुलूस मधील टवाळखोर मुलांनी काढल्याचा आरोप भाजपा खासदार मनोज कोटक यांनी केला असून प्रसारमाध्यमांसमोर कोटक यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. या संतापजनक घटनेनंतर काही हिंदू संघटनानी पार्कसाईड पोलीस ठाण्याकडे (Parksite Police Station) धाव घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकारामुळे विक्रोळी परिसरात तणाव निर्माण होऊन वातावरण तापले आहे. पोलिसांकडून या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. (Vikhroli Police Station)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community