• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
33 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Sunday, May 11, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home विशेष Motorman Viral Video : लोकल प्रवाशांनी नेहमीच्या मोटरमनला ‘असा’ दिला निरोप
  • विशेष

Motorman Viral Video : लोकल प्रवाशांनी नेहमीच्या मोटरमनला ‘असा’ दिला निरोप

‘आम्हाला इतकी वर्षं धक्केविरहित आणि सुरक्षित रेल्वेसेवा देणाऱ्या व्यक्तीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!’

September 6, 2023
187
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    Motorman Viral Video : लोकल प्रवाशांनी नेहमीच्या मोटरमनला ‘असा’ दिला निरोप
    Motorman Viral Video : लोकल प्रवाशांनी नेहमीच्या मोटरमनला ‘असा’ दिला निरोप
    • ऋजुता लुकतुके

    मोटरमनच्या कामाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या नेहमीच्या प्रवाशांनी त्यांना हटके निरोप दिला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मुंबई नगरीत एका मोटरमनचा कामाचा शेवटचा दिवस सगळ्या प्रवाशांनी मिळून साजरा केल्याचा एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. मुंबई लोकल युजर्स या ट्विटर अकाऊंटने हा व्हीडिओ ३ सप्टेंबरला पहिल्यांदा टाकला. त्यांनी व्हिडिओवर एक छोटासा संदेश लिहिला आहे, ‘आम्हाला इतकी वर्षं धक्केविरहित आणि सुरक्षित रेल्वेसेवा देणाऱ्या व्यक्तीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!’

    हळू हळू हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झालाय. आणि एकट्या ट्विटरवर तो ५०,०००च्या वर लोकांनी पाहिलाय. मोटरमनचं नाव यात स्पष्ट केलेलं नाही. पण, त्यांनी आपली शेवटची लोकल ट्रेन सीएसएमटी स्थानकात लावल्यावर प्रवाशांनी चक्क ढोल-ताशे बडवून त्यांना मानवंदना दिली. तसंच त्यांना ओवाळून प्रवासी त्यांना टिळाही लावताना दिसतायत. त्यानंतर ढोल ताशाच्या गरजावर लोक उत्स्फूर्तपणे नाचतानाही दिसतायत.

    A celebration last week when a motorman drived the local train for the last time on his retirement day.
    After putting in many years of service that to without a snag is quite a big achievement.@AshwiniVaishnaw @RailMinIndia pic.twitter.com/It9wpWmMNI

    — Mumbai Railway Users (@mumbairailusers) September 3, 2023

    (हेही वाचा – Tata Haldiram Deal : टाटा समुहाचा हलदीराम विकत घेण्याचा प्रयत्न?)

    ‘गेल्या आठवड्यात एक मोटरमन सेवेतून निवृत्त झाले. इतकी वर्षं त्यांनी इमाने इतबारे सेवा बजावली. आणि त्यांचं रेल्वे चालकाचं कौशल्यही वादातीत होतं,’ असं ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं आहे. मुंबई रेल्वे युजर्स हे ट्विटरवरील एक सक्रिय खातं आहे. मुंबई उपनगरी सेवेतील मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर अशा सर्व मार्गांवरील रेल्वेविषयीचे सगळे अपडेट इथं दिले जातात. या खात्याचे जवळ पास दीड लाख फॉलोअर्स आहेत. मोटरमनविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या पोस्टमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही टॅग करण्यात आलंय. इतर ट्विटरच्या सदस्यांना ही पोस्ट आवडलीय हे त्यांच्या कमेंटवरून दिसतंय. एकाने लिहिलंय की, ‘भारतीय रेल्वे मला म्हणूनच आवडते.’ तर दुसऱ्या एकाने म्हटलंय, ‘मुंबई मेरी जान असं म्हणतात ते उगीच नाही.’ आणखी एका वाचकाने सामान्य नोकरदार व्यक्तीचा कामाचा शेवटचा दिवस असा साजरा केल्याबद्दल खास आनंद व्यक्त केला आहे.

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • bid farewell
    • farewell
    • Indian Railways
    • last day
    • last day of work
    • local
    • motorman
    • Motorman Viral Video
    • mumbai local
    • Mumbai Local Users
    • Mumbai Meri Jaan
    • Passengers
    • railway
    • railway motorman
    • regular passengers
    • Twitter account
    • Twitter post
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleBest Open Deck Bus : बेस्ट नवीन ‘ओपन डेक’ गाड्यांची करणार खरेदी, तोपर्यंत दुमजली वातानुकुलित बसमधून अनुभवता येणार मुंबई दर्शन
      Next articleMMRDA : मेट्रो कारशेडसाठी जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • भारतीय वायूदलाचं Operation Sindhoor सुरुच ! May 11, 2025
      • India Pakistan War : सिद्धिविनायक मंदिरात हार, नारळ अर्पण करण्यावर प्रतिबंध May 11, 2025
      • India Pakistan War : भारत-पाक युद्धात पाकची पाठराखण करणाऱ्या चीनचा अजित डोवाल यांना फोन, म्हणाले…. May 11, 2025
      • Rajkot किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ! May 11, 2025
      • India Pakistan War : भारताच्या विजयासाठी नाशिक येथे ‘युद्ध विजय यज्ञ’ संपन्न May 11, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • भारतीय वायूदलाचं Operation Sindhoor सुरुच ! May 11, 2025
      • India Pakistan War : सिद्धिविनायक मंदिरात हार, नारळ अर्पण करण्यावर प्रतिबंध May 11, 2025
      • India Pakistan War : भारत-पाक युद्धात पाकची पाठराखण करणाऱ्या चीनचा अजित डोवाल यांना फोन, म्हणाले…. May 11, 2025
      • Rajkot किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ! May 11, 2025
      • India Pakistan War : भारताच्या विजयासाठी नाशिक येथे ‘युद्ध विजय यज्ञ’ संपन्न May 11, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline