मलेशियाच्या रोकैया समत ६२ वर्षांच्या, त्यांना स्वत:ची ११ मुले, तर २२ नातवंडे असतानाही आता त्या २७ वर्षीय सबहान महंमद अमीन जुमदैलशी लग्न केल्यामुळे चर्चेत आहेत. रोकैया समत यांचे हे तिसरे लग्न आहे. रोकैयांचे म्हणणे आहे की, मी आता ६२ व्या वर्षीही चाळीशीत आहे असे वाटते. तसेच हे त्यांचे शेवटचे लग्न असेल अशी आशा व्यक्त केली आहे.
अहवालानुसार, २०२१ मध्ये टिकटॉक या सोशल मिडीयाच्या माध्यमातून रोकैया आणि महंमद एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांची भेट झाली आणि त्या दोघांची जवळीकही वाढत गेली. जून २०२२ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. तीन महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये लग्न केले. आता एका टिकटॉक व्हिडिओमुळे हे लग्न चर्चेचा विषय बनले आहे. काही अहवालांमध्ये महंमदचे वय २८ आणि रोकैयाची १० मुले असल्याचे नमूद केले आहे.
रोकैयाचा स्वत:चा मोठा मुलगा ४५ वर्षांचा तर सगळ्यात लहान मुलगा १८ वर्षांचा आहे. महंमदच्या लग्नाबद्दल विचारले असता, तो म्हणाला, “तो एक अतिशय पवित्र, जबाबदार, निडर आणि काळजी घेणारा व्यक्ती आहे.” रोकैयाच्या म्हणण्यानुसार, त्याला आपल्या मुलांसोबत राहणे आवडत नाही. रोकैयांना जीवनसाथीची गरज भासत होती, म्हणून मी दुसरे लग्न केले आहे. त्या म्हणतात, “ही अल्लाहची इच्छा आहे. वयाचा मला फरक पडत नाही. प्रामाणिक पती शोधणे महत्वाचे आहे.”
(हेही वाचा Veer Savarkar : कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा हिंदुद्वेष; सत्तेत येताच वीर सावरकरांवरील धडा अभ्यासक्रमातून वगळला )
रोकैया यांचे पहिले लग्न १९७७ मध्ये झाले होते जे ४० वर्षे टिकले. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिने २०१८ मध्ये एका म्यानमारच्या पुरुषाशी लग्न केले. हे जेमतेम दोन वर्षे चालले. रोकैयाच्या म्हणण्यानुसार, तिचा दुसरा नवरा चीनमध्ये काम करायचा. त्यामुळे नात्यात उमेद न राहिल्याने त्यांचा घटस्फोट झाला.
काही दिवसांपूर्वी रोकैया आणि महंमद यांनी त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ टिकटॉकवर पोस्ट केला होता. तो २४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यामध्ये दोघांनी वयातील अंतरही सांगितले आहे. रोकैया सांगतात, “तो (महंमद) वयाने अगदी लहान असला तरी मला खात्री आहे की तो पती म्हणून माझी शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेतील. मला आशा आहे की हे माझे शेवटचे लग्न असेल. महंमद म्हणतो की, सुरुवातीला त्याला रोकैय्याचे मित्र व्हायचे होते, पण नंतर तो त्यांच्यात वहावत गेला. यानंतर, अखेर २०२२ मध्ये रोकैयांच्या वाढदिवशी म्हणजे १० जानेवारीला महंमद त्यांच्या घरी पोहोचला. दोघांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी लग्न केले होते.
(हेही वाचा Veer Savarkar : सावरकरांनी नाही लिहिले ‘लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर’)
Join Our WhatsApp Community