लैंगिक शोषण प्रकरणातून ब्रिजभूषण सिंह यांना क्लिन चीट

138
लैंगिक शोषण प्रकरणातून ब्रिजभूषण सिंह यांना क्लिन चीट
लैंगिक शोषण प्रकरणातून ब्रिजभूषण सिंह यांना क्लिन चीट

अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात क्लोजर रिपोर्ट आणि चार्जशीट दाखल केला आहे. यामध्ये पोस्को कायद्यांतर्गत दाखल प्रकरणात सिंह यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात ७ महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या प्रकरणात २ न्यायालयांमध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली. पटियाला हाऊस न्यायालयात अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीसंदर्भातला क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यात अल्पवयीन महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण झाल्याचा सबळ पुरावा आढळला नाही त्यामुळे पोस्को कायद्यांतर्गत ब्रिजभूषण यांच्यावर कुठलेही आरोप लावता येणार नसल्याचे पोलिसांच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा – जाहिरातबाजीवर देवेंद्र फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले…)

७ महिला कुस्तीगिरांनी २१ एप्रिल २०२३ रोजी दिल्ली पोलिसात ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषण प्रकरणात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी २८ एप्रिल रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात २ प्रकरणे नोंदवली होती. पहिले प्रकरण ७ कुस्तीगीर महिलांच्या लैंगिक शोषणाचे होते. तर दुसरे प्रकरण एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाचे होते. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीगीर महिलेने हा जो जबाब दिला होता तो नंतर बदलला होता. सुरुवातीला तिने लैंगिक शोषण झाल्याचे आरोप केले होते. त्यानंतर तिने आपला जबाब बदलून कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भेदभाव केल्याचा आरोप केला होता.

या अल्पवयीन महिला कुस्तीगीराने मॅजिस्ट्रेटच्या समोर आधी लैंगिक शोषण झाल्याचे म्हटले होते. तर दुसऱ्यांदा जबाब नोंदवताना मी चिडून गेल्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मात्र ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मला निवडले नाही निवड करताना भेदभाव केला असे वक्तव्य करत आपला आधीचा आरोप मागे घेतला. मी डिप्रेशनमध्ये गेले होते असेही या महिला कुस्तीगीराने सांगितले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.