जाहिरातबाजीवर देवेंद्र फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले…

204
जाहिरातबाजीवर देवेंद्र फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले...
जाहिरातबाजीवर देवेंद्र फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले...

शिवसेनेच्या जाहिरातबाजीवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं असताना गुरुवारी, १५ जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र पाहायला मिळाले. निमित्त होत, पालघरमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं. या कार्यक्रमाला जाताना शिंदे आणि फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमधून गेले. परंतु त्यानंतर एकाच गाडीतून जाण्यास फडणवीसांनी नकार दिला. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्यात जाहिरातीवरून बिनसलं असल्याची चर्चा अधिकच होऊ लागली. पण या जाहिरातबाजीवर देवेंद्र फडणवीसांनी या जाहीर कार्यक्रमातून प्रतिक्रिया देत आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांचा आहे. पण गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणीही करण्याचं कारण नाहीये, असे फडणवीस म्हणाले.

नेमके फडणवीस काय म्हणाले?

‘मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरलो. एक पत्रकार आला आणि म्हणाला की, तुम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला. कसं वाटतं आहे? आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांचा आहे. पण गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट झाला आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणीही करण्याचं कारण नाहीये. तो कालही सोबत होता, आजही सोबत आहे आणि उद्याही सोबत असणार आहे. आम्ही सरकार तयार केलं, खुर्च्या तोडण्याकरता नाही. आम्ही सरकार तयार केलं, पद मिळवण्याकरता नाही. हे सरकार जनसामान्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे. दिन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेत मजूर, महिला, अल्पसंख्यांक सगळ्यांच्या जीवनामध्ये गुणात्मक बदल झाला पाहिजे, म्हणून हे सरकार तयार झालं. त्यामुळे मला असं वाटतंय, एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठेही या सरकारमध्ये काही होईल, एवढं हे तकलादू सरकार नाहीये. हे जुनं सरकार नाहीये की, कोणी आधी भाषण करायचं आणि कोणी नंतर भाषण करायचं, याच्याकरता आम्ही गच्ची पकडणारे बघितले, पण हे सरकार सामान्य जनतेकरता काम करणारं सरकार आहे आणि जोपर्यंत सामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आमचं सरकार हे सदैव कार्यरत राहिलं,’ असं फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.