बिपरजॉय चक्रिवादळाने रौद्ररुप धारण केलं आहे. ‘बिपरजॉय’च्या (Biporjoy Cyclone) प्रभावामुळे गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे पुराचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. हे वादळ आज म्हणजेच १५ जून रोजी संध्याकाळपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने योग्य ती खबरदारी घेतली आहे. किनारी भागातील लोकांना सुरक्षीतस्थळी हलवण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत ७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून एनडीआरएफची ३३ पथके तैनात करण्यात आली आहेत.
(हेही वाचा – Security Guards : मुंबईतील समुद्र चौपाट्यांवर १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी तिन्ही सेना प्रमुखांशी चर्चा केली. चक्रीवादळ बिपरजॉयच्या (Biporjoy Cyclone) प्रभावांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांच्या तयारीचा आढावा घेतला. सज्जतेचा आढावा घेतल्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सशस्त्र दल सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. तिन्ही सेना प्रमुखांशी बोलून बिपरजॉय चक्रीवादळाच्या संदर्भात सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेतला. लष्कर, नौदल आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) देखील मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहेत.
Spoke to all three Service Chiefs and reviewed the preparedness of the Armed Forces for the landfall of cyclone ‘Biparjoy’.
The Armed Forces are ready to provide every possible assistance to civil authorities in tackling any situation or contingency due to the cyclone.
— Rajnath Singh (@rajnathsingh) June 14, 2023
७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यश
गुजरातच्या किनारी (Biporjoy Cyclone) भागातून आतापर्यंत ७४ हजारांहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना तात्पुरता निवारा छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. एकट्या कच्छ जिल्ह्यात सुमारे ३४,३०० लोकांना, जामनगरमध्ये १०,००० मोरबीमध्ये ९२४३, राजकोटमध्ये ६०८९, देवभूमी द्वारकामध्ये ५०३५, जुनागढमध्ये ४६०४, पोरबंदर जिल्ह्यात 3३४९६ आणि सोमनाथ जिल्ह्यात ५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community