आदित्य ‘ठाकरे सरकार’मधून बाहेर पडणार? काय आहे सत्य

114

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी अप्रत्यक्षपणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विरोधक लक्ष्य करत असतानाच आता आदित्य ठाकरे हे सरकारमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. या चर्चेचे मुख्य कारण म्हणजे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये केलेला बदल. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमधून पर्यटन आणि पर्यावरण मंत्री हे शब्द काढून टाकल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झाल्याने खरंच आदित्य ‘ठाकरे सरकार’मधून बाहेर पडणार की या फक्त अफवाच आहेत असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

ही फक्त अफवाच

दरम्यान आदित्य ठाकरे हे सरकारमधून बाहेर पडणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताच आदित्य ठाकरे यांनी स्वत: पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे. २०१३ पासून मी माझ्या ट्विटर हँडलवरील बायो अजिबात बदललेला नाही. माझ्या इन्स्टाग्रामवरील प्रोफाईलमध्ये मी माझ्या खात्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे.

आदित्य ठाकरे विरोधकांच्या रडारवर

सुशांतच्या आत्महत्येचा संबंध अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. भाजपा खासदार नारायण राणे यांनी देखील या प्रकरणात ठाकरे सरकारमधील युवा मंत्री सहभागी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांनंतर राणेंची दोन्ही मुले आणि भाजपा नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्ष टार्गेट केले जात आहे. कालच भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच ड्रग्स-पब अँड पार्टी गँगने सुशांत सिंह राजपूतचा बळी घेतल्याची टीका करत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.