मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

119
मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

“स्वातंत्र्यवीर सावरकर हे मानवरूपी कल्पवृक्ष होते. ज्याप्रमाणे एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळे, मुळे उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते; त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील, कवी, लेखक, साहित्यिक, तत्वचिंतक, समाजसुधारक, व्हिजनरी असे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे वीर सावरकर यांचे प्रखर विचार हे आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपली जबाबदारी आहे”, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मॉरिशस येथे केले. वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मॉरिशसमध्ये वीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत रुजवण्याचे कार्य अव्याहतपणे सुरू राहावे म्हणून मॉरिशस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मॉरिशसच्या राजधानीत वीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

(हेही वाचा – Veer Savarkar Jayanti 2023: ‘शोध हा नवा- शतजन्म शोधिताना’ या कार्यक्रमातून वीर सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे दर्शन)

मॉरिशस आणि महाराष्ट्राचे भावबंध हिंदी महासागराएवढे गहिरे आणि विशाल आहेत. मॉरिशसच्या मराठी बंधू भगिनींनी २०० वर्ष आपली हिंदू संस्कृती जपली आहे. या देशात मराठी भाषा वाढविण्याचे आणि संवर्धन करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इथल्या सरकारच्या विविध मंत्रालयांना भेटी देत असताना २०१४ नंतर मोदीजींनी मॉरिशसला विशेष मित्रराष्ट्राचा दर्जा दिल्याने भारताचे आणि मॉरिशसचे भावबंध अजून घट्ट झाल्याचे जाणवले. महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात व्यावसायिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ऋणानुबंध वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. त्यातूनच वीर सावरकरांचा अर्धाकृती पुतळा महाराष्ट्रातर्फे आम्ही रविवारी, २८ मे रोजी भेट दिला आहे. वीर सावरकरांच्या विचारांची ऊर्जा मॉरिशसच्या समस्त हिंदू आणि मराठी बांधवांना मिळत राहील, असेही चव्हाण यांनी सांगितले.

वीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू

  • अटल बिहारी वाजपेयी आणि मोरेश्वर यांचेही एक अतूट नाते होते. डिजिटल क्रांती झाली त्या डिजिटल क्रांतीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान होते. वीर सावरकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. वीर सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते. त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. अंदमानच्या कारावासातही वीर सावरकर यांनी आपले अजरामर काव्य रचले. अंदमानमधील सेल्युलर जेलमधील भिंतीवर कोरलेले वीर सावरकरांचे राष्ट्रभक्तीपर काव्य आजही त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे.” असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
  • “भारत आणि मॉरिशस राष्ट्र या दोन्ही देशांचे संबंध अतिशय वृद्धिंगत होताना दिसत आहेत. विशेषतः पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने भारत आणि मॉरिशस हे दोन्ही विकासाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक रित्या पुढे जात आहेत. मॉरिशस मधील सांस्कृतिक चळवळ ही वृद्धिंगत होताना दिसत आहे” असेही गौरवोद्गार मंत्री चव्हाण यांनी यावेळी काढले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.