Rohini Khadse: भाजपच्या ऑफरवर काय आहे रोहिणी खडसेंची भुमिका

184
Rohini Khadse
Rohini Khadse

शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. नुकताच सोशल मीडियात त्यांनी तुतारी वाजवतानाचा एक फोटो ट्विट केला आहे. रोहिणी खडसे सध्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत.

(हेही वाचा – Kanhaiya Kumar : ‘भारत तेरे टुकडे होंगे’ घोषणा देणारा कन्हैया कुमार आठवतो का; काँग्रेस देऊ शकते उमेदवारी)

एकनाथ खडसे आमदारकीचा राजीनामा देणार?

भाजपने खडसे कुटुंबाला पक्षात घेण्यास परवानगी दिल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासमोर एक अट ठेवली आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद़ पवार गटाच्या कोट्यातून मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजपमध्ये सहभागी व्हावं. त्या बदल्यात एकनाथ खडसे यांच्या आमदारकीच्या जागी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची उरलेल्या कालावधीसाठी पाठवणी होईल.

(हेही वाचा – Kiran Pavaskar : उबाठाला कॉंग्रेसचा जाहिरनामा मान्य आहे का ? – किरण पावसकर)

सध्या विधानपरिषदेत शरद पवार गटाचे केवळ तीन आमदार आहेत. यामध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) स्वत:, आमदार अरुण अण्णा लाड आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला तर आपोआपच शरद पवार गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी होईल आणि परिणामी ती जागा विधानपरिषदेत मोठ्या संख्येने असणाऱ्या भाजपकडे जाईल. भाजप रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची त्याच जागेवर वर्णी लावू इच्छित आहे. अशी माहिती आहे.

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.