Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराची उभारणी विनासंकट होण्यासाठी वर्षभर यज्ञ

नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातून अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होणारे प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमानाच्या मूर्तीसाठी पैठणी आणि अन्य भरजरी वस्त्र पाठवण्यात आले. विशेष म्हणजे तीनशे दिव्यांग कारागिरांनी ही वस्त्रे तयार केली आहेत.

216
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराची उभारणी विनासंकट होण्यासाठी वर्षभर यज्ञ
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराची उभारणी विनासंकट होण्यासाठी वर्षभर यज्ञ

नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातून अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होणारे प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमानाच्या मूर्तीसाठी पैठणी आणि अन्य भरजरी वस्त्र पाठवण्यात आले. विशेष म्हणजे तीनशे दिव्यांग कारागिरांनी ही वस्त्रे तयार केली आहेत.

अयोध्येतील प्रभु श्रीराम मंदराची (Ram Mandir) उभारणी विनासंकट व्हावी, त्यात बाधा येऊ नये, यासाठी अयोध्येत एक वर्षापासून अनोखा यज्ञ सुरू आहे. २६ जानेवारी २०२३ रोजी वसंत पंचमीपासून या यज्ञाला सुरुवात झाली.

रामकोट भागातील रामनिवास मंदिरात हा यज्ञ अखंड सुरू आहे. मंदिराचे काम विनासंकट व्हावे, एवढाच त्याचा उद्देश नाही, तर राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी करत असलेल्या सामान्य बांधकाम मजुरांपासून या उभारणी आणि इतर कार्यात ज्यांचे हात लागले आहेत त्या कोणाच्याच आयुष्यात कोणतेही संकट येऊ नये, या उद्देशान हा यज्ञ गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यज्ञाचे प्रभारी आचार्य गोपाल पांडेय यांनी ही माहिती दिली.

(हेही वाचा – Sunday Megablock : तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक, कसे असेल वेळापत्रक; वाचा सविस्तर)

अयोध्या आणि परिसरात १० पंडितांचा एक चमू एक आठवडा यज्ञ करतात. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात पंडितांचा चमू बदलतो. असे दर आठवड्याला सुरू असते. या पंडितांच्या आराम आणि भोजनाची व्यवस्था मंदिर परिसरातच करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार हे अलीकडेच एक दिवसासाठी यजमान बनले होते.

कसे असते यज्ञाचे वेळापत्रक –
सकाळी ८ वाजता यज्ञ सुरू होतो. २ तासांच्या यज्ञानंतर सूर्यास्तापर्यंत अखंड रामनाम संकिर्तन सुरू असते. त्यानंतर देवदेवतांचे पूजन आणि अभिषेक केला जातो. नवग्रह हवन, अष्टोत्तर रामनाम हवन आणि आरती होते.

(हेही वाचा – Ind vs Eng Test Series : मोहम्मद शामी, ईशान किशन यांचा विचार नाही, ध्रुव जेरेल एकमेव नवीन चेहरा)

दररोज पूजेचे स्वरुप बदलते…
सोमवारी रुद्राभिषेक, मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण, बुधवारी गणपती, अथर्वशीर्ष पठण, गुरुवारी पुरुष सुक्त, शुक्रवारी श्रीसुक्त ऋग्वेद, शनिवारी सुंदरकांडाचा पाठ होतो. अशा प्रकारे दररोज पूजेचे स्वरुप विशिष्ट आणि बदलत असते.
येवल्याहून अयोध्येत पोहोचली पैठणी…
नाशिक जिल्ह्यातील येवला या पैठणीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या शहरातून अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होणारे प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमानाच्या मूर्तीसाठी पैठणी आणि अन्य भरजरी वस्त्र पाठवण्यात आले. विशेष म्हणजे तीनशे दिव्यांग कारागिरांनी ही वस्त्रे तयार केली आहेत. येवला येथील कापसे फाउंडेशनकडून ही अनोखी भेट पाठवली आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी ही भेट स्वीकारली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.