PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

100
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

पुणे तसेच पिंपरी-चिंचाड येथील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करून जनतेला समर्पित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर असणार आहेत. सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. पंतप्रधान यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सकाळी ११.४५ वाजता प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी १२:४५ वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा कंदील दाखवून, विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प २ ला हिरवा झेंडा दाखवून, पंतप्रधान, मोदी हे पुणे मेट्रो टप्पा १ च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत मेट्रो रूट असणार आहे. २०१६ मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडून, या प्रकल्पांचे लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

(हेही वाचा – Crop Insurance : पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदत वाढ)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे २.५ लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाईल. सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १२८० हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत बांधलेली २६५० हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. यासोबतच, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी १ ऑगस्ट रोजी असल्याने, लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान केला जाणार आहे. पंतप्रधान या पुरस्काराचे ४१ वे मानकरी असतील. या पूर्वी या मानाचे पुरस्कार प्राप्त करणारे, डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन आर नारायण मूर्ती, डॉ. ई‌. श्रीधरन या मान्यवरांचा समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.