पावसाळी अधिवेशन आता ७ सप्टेंबरपासून

116

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सात सप्टेंबरपासून होणार असून, आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरु होणार होते. मात्र मार्च महिन्यांपासून राज्यात असणारे कोरोनाचे संकट यामुळे २२ जून पासून सुरु होणारे पावासाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  तसेच ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन अवघ्या दोन ते तीन दिवसांचा बोलावण्याचा विचार राज्य सरकारचा होता. मात्र अजूनही राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत नसून, अधिवेशन काळात होणारी गर्दी लक्षात घेता ३ ऑगस्टला अधिवेशन घेणे योग्य नसल्याचे काही मंत्र्यांचे म्हणणे होते. याचमुळे येत्या ३ ऑगस्टपासून सुरु होणारे अधिवेशन पुढे ढकलले असून, हे अधिवेशन ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

काय म्हणाले अनिल परब 

पावसाळी अधिवेशन सात सप्टेंबरला होणार असून, आता हे अधिवेशन किती दिवसाचे करायचे, कशा पद्धतीने करायचे हे ठरवण्यासाठी अधिवेशनाच्या आधी कामकाज सल्लगार समितीची बैठक होईल आणि त्यानंतर अधिवेशन किती दिवस आणि अधिवेशनात कोणकोणते मुद्दे घ्यायचे हे ठरवले जाईल. काही मर्यादित सदस्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन घेऊया असे मी विरोधी पक्षनेत्यांना सांगितले होते. मात्र अधिवेशनाला उपस्थित राहणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तसे करता येणार नाही असे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. त्यांचे हे म्हणणे कायदेशीररीत्या बरोबर आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये खालच्या सभागृहाचे २८८ आमदार आणि वरच्या सभागृहाचे ७८ आमदार तसेच त्यांचे पीए आणि ड्रायव्हर यांची व्यवस्था करणे कठीण आहे त्यामुळेच हे अधिवेशन आता पुढे ढकलले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.