chocolate : चॉकलेट खायचे जसे तोटे तसे फायदेही जाणून घ्या…

150

चॉकलेट मधुमेह, दात किडणे, उच्च रक्तदाब आणि मुरुम यांसारख्या आरोग्याच्या समस्यांशी निगडित आहे असं म्हटलं जातं. पण त्याचे आरोग्यावर बरेच सकारात्मक परिणाम देखील आहेत. हे जगातील अँटीऑक्सिडंट्सच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. आज आपण चॉकलेटचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेणार आहोत. हे वाचून तुम्हाला चॉकलेट खाल्लं की अपराधी असल्याची भावना मनात येणार नाही, त्यामुळे हे फायदे नक्की वाचा आणि लक्षात ठेवा.

त्वचेचा लुक वाढवतो

डार्क चॉकलेट त्वचेचे तारुण्य टिकवून ठेवण्यास मदत करते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

रक्तदाब कमी होतो

जेव्हा एंडोथेलियम उत्तेजित होते तेव्हा नायट्रिक ऑक्साईड तयार होते, जे रक्तदाब कमी करते. चॉकलेट खाल्ल्याने नायट्रिक ऑक्साईड तयार होते.

आपल्याला आनंदी बनवते

चॉकलेटच्या रासायनिक घटकांमुळे, जसे की फेनिलेथिलामाइन, जे प्रेमात पडण्यासारखी भावना निर्माण करते. चॉकलेट अँटीडिप्रेसर म्हणून कार्य करते, चॉकलेट एक मान्यताप्राप्त मूड चेंजर आहे. चॉकलेट आनंदास प्रोत्साहित करतात.

(हेही वाचा Tomato : टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याची केंद्राची NCCF – NAFED ला सूचना)

मेंदूसाठी उत्तम

फ्लॅव्हानॉल असल्यामुळे चॉकलेट एकाग्रता वाढवते आणि मेंदूत रक्त प्रवाह चांगला होतो. चॉकलेट मेंदूसाठी उत्तम आहे.

हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो

दररोज १९ ते ३० ग्रॅम चॉकलेटचे सेवन केल्यास हार्ट फेल व्हायची शक्यता कमी होते. कोकोमध्ये अशी वैशिष्ट्ये आहेत जी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात.

वजन कमी करण्यास मदत करते

जेवणाच्या २० मिनिटे आधी आणि जेवणानंतर पाच मिनिटांनी डार्क चॉकलेटचा तुकडा खाल्ल्यास वजन कमी होतं. ‘चॉकलेट खा, वजन कमी करा’, अशी म्हण आहे. हे केवळ उच्च कोको सामग्री असलेल्या डार्क चॉकलेटवर लागू होते. मिल्क चॉकलेट रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते आणि आपली लालसा वाढवू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.