Israel Double Attack : हमास आणि हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा ‘दुहेरी हल्ला’, १ कमांडर आणि २ दहशतवादी ठार

इस्त्रायल सध्या दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे.

68
Israel Double Attack : हमास आणि हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा 'दुहेरी हल्ला', १ कमांडर आणि २ दहशतवादी ठार
Israel Double Attack : हमास आणि हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा 'दुहेरी हल्ला', १ कमांडर आणि २ दहशतवादी ठार

इस्त्रायलने हमास आणि हिजबुल्लाहवर दुहेरी हल्ला (Israel Double Attack) केला. यामध्ये इस्त्रायली सेनेला यश मिळत आहे. इस्त्रायली सेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात अयमान नोफल ठार झाला आहे. तो हमासचा वरिष्ठ कमांडर असल्याचे सांगितले जात आहे.

इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, अयमान हमासचा जनरल मिलिटरी कौन्सिलचे सदस्य होते. याशिवाय इस्रायली लष्कराने दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या दोन दहशतवाद्यांनाही ठार केले आहे.

(हेही वाचा – Israel-Palestine War: क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर लोकांचा भूकबळी, औषधे-पाण्याचा तुटवडा; गाझा पट्टीवर भयावह परिस्थिती)

इस्त्रायल सध्या दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. एकीकडे तो गाझा पट्टीतून (gaza strip) हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. दुसरीकडे, लेबनॉनमधून हिजबुल्लाह दहशतवादी त्याच्यावर हल्ले करत आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून हवाई हल्ले केले जात आहेत.

इस्रायली लष्कराने हमास कमांडर मारला गेल्याचे म्हटले आहे तसेच हवाई हल्ल्यात आपले सदस्य मारले गेल्याची कबुली खुद्द हिजबुल्लानेच दिली आहे. हिजबुल्लाहने त्यांची नावे अब्बास फैसी आणि मोहम्मद अहमद काझिम अशी सांगितली आहेत.

हिजबुल्लाहकडून यासंदर्भातील एक व्हिडियोही सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडियोमध्ये संघटनेने एका कारला लक्ष्य करून तिच्यावर क्षेपणास्त्र डागले आहे. हा हल्ला इस्त्रायलमधील मेटुला (Metula) शहरावर होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.