ICC World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान उपान्त्य फेरीत आमने सामने येतील का?

149
  • ऋजुता लुकतुके

भारताने ICC World Cup 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेबरोबरच २४३ धावांनी विजय मिळवल्यानंतर गुणतालिकेत अव्वल स्थान बळकट केलं आहे. आणि प्रत्येक संघाचा शेवटचा एकच साखळी सामना बाकी असल्यामुळे भारतीय स्थानाला धक्का लागणार नाही. याउलट दक्षिण आफ्रिका सध्या दुसऱ्या स्थानावर असला तरी त्यांचं गुणतालिकेतील स्थान अजून निश्चित झालेलं आहे.

म्हणजे दुसरं, तिसरं आणि चौथं स्थान अजून ठरायचंय. त्यानुसार, उपान्त्य फेरीच्या लढतीही ठरतील. पण, यात सगळीकडे चर्चा सुरू आहे ती, संभाव्या भारत वि पाकिस्तान अशा उपान्त्य सामन्याची. याची शक्यता किती आहे ते पाहूया…

दक्षिण आफ्रिकेचे सध्या ८ सामन्यातून १२ गुण झाले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे ७ सामन्यांतून १० गुण झाले आहेत. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ ८ गुणांवर आहेत. आणि त्यांचा प्रत्येकी एक सामना बाकी आहे.

विश्वचषक २०२३ मधील ताजी गुणतालिका

क्रमांक

देश

सामने

विजय

पराभव

गुण

नेट रनरेट

भारत

००

१६

२.४५६

द आफ्रिका

१२

१.३७६

ऑस्ट्रेलिया

१०

०.९२४

न्यूझीलंड

०.३९८

पाकिस्तान

०.०३६

अफगाणिस्तान

-०.३३०

श्रीलंका

-१.१६३

नेदरलँड्स

-१.३९८

बांगलादेश

-१.४४६

१०

इंग्लंड

-१.५०४

 

भारताने ICC World Cup 2023 मध्ये उपान्त्य फेरीत पहिला आणि चौथ्या क्रमांकाचे संघ आमने सामने येतील. तर दुसरा उपान्त्य सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या संघांतच होईल. यात ऑस्ट्रेलियाने आपले दोनही सामने गमावले, तरंच ते तिसऱ्या क्रमांकावरून खाली येऊ शकतील. आणि त्यावेळी तीनही संघांचा आणि न्यूझीलंडचाही  रनरेट निर्णायक ठरेल. आणि यात सरस ठरलेला संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

(हेही वाचा Angelo Mathews Timed Out : अँजेलो मॅथ्यूज टाईम्ड आऊट होणारा जगातील पहिला फलंदाज; टाईम्ड आऊट म्हणजे काय?)

पाकिस्तान आणि भारत उपान्त्य फेरी सामन्यासाठी पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी काय शक्यता आहेत, पाहूया…

पाकिस्तान आपला शेवटचा साखळी सामना इंग्लंड बरोबर ११ नोव्हेंबरला खेळणार आहे. तोपर्यंत इतर संघांचे सामने संपून पाकिस्तानला गुणतालिकेच्या गणिताची कल्पना आलेली असेल. न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धचा सामना गमावला. आणि पाकिस्तानने इंग्लंड विरुद्ध विजय मिळवला, तर पाकिस्तानचे १० गुण होतील. आणि ते न्यूझीलंडला मागे टाकतील.

पण, त्याचवेळी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने आपले उरलेले सामने गमावायाला हवेत. तर पाकिस्तानचा प्रवेश इतका सुकर होईल.

याउलट अफगाणिस्तानने एक जरी सामना जिंकला तर त्यांचे १० गुण होतील आणि ते आणि पाकिस्तान यांच्यात रनरेटवरून कुणाची आगेकूच होणार हे ठरेल. अफगाणिस्तानने दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे १२ गुण होतील. आणि ते उपान्त्य फेरीत पोहोचतील.

शक्यता दुसरी

जर न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला. आणि पाकने इंग्लंडला हरवलं. दुसरीकडे अफगाणिस्तानने उर्वरित दोन्ही सामने गमावले, तर न्यूझीलंड आणि पाकचे १० गुण होतील. आणि दोघांपैकी सरस रनरेट असलेला संघ पुढे जाईल. यात पाकिस्तानचा सामना शेवटी असल्यामुळे त्यांना काय फरकाने हा सामना जिंकावा लागेल याचं गणित डोळ्यासमोर असेल. फक्त ते त्यांना पार करावंच लागेल.

शक्यता तिसरी 

न्यूझीलंडचा सामना पावसात वाहून गेला तर पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध विजय मिळवून जास्त गुणांच्या जोरावर उपान्त्य फेरीत जाता येईल. त्यासाठी अफगाणिस्तानने दोन्ही सामने गमवावे लागतील. अफगाणिस्तान एक जरी सामना जिंकला, तरी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सरस रनरेटवर फैसला होईल.

न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोघांचे सामने पावसात वाहून गेले किंवा काही कारणांनी अनिर्णित राहिले, तर सरस रनरेटच्या आधारे न्यूझीलंड उपान्त्य फेरीत पोहोचेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.