सुशांत आत्महत्या प्रकरण: तपासासाठी सीबीआय मुंबईत दाखल

90

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. सीबीआय पथक सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी संबधित कागदपत्रे वांद्रे पोलिसांकडून ताब्यात घेण्याची शक्यता आहे. हे पथक घटनास्थळाची पाहणीही करण्याची शक्यता आहे. दरम्यान याप्रकरणी बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन गोळा केलेले पुरावे सीबीआयने आधीच ताब्यात घेतले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे पथक मुंबई पोलिसांकडून घटनास्थळाच्या पंचनाम्यापासून संभाव्य साक्षीदारांच्या जबाबांपर्यंत सर्व कागदपत्रे ताब्यात घेणार आहे. यात सुशांतचे शवचिकित्सा अहवाल, न्यायवैद्यक प्रयोग शाळेने केलेला तपास, सीसीटीव्ही चित्रण, कॉल डेटा रेकॉर्डचाही समावेश असेल.

10 जणांचे पथक मुंबईत दाखल

सुवेझ हक हे सीबीआयचे नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सीबीआयचं 10 सदस्यीय पथक मुंबईत दाखल झाले आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत केले असून, मुंबई पोलीस सीबीआयच्या तपासाला सहकार्य करेल असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात कोणताही दोष आढळलेला नाही. मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला असे अनिल देशमुख यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.