ब्रिटनचे उप उच्चायुक्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, जगदंबा तलवार, वाघनखे भारतात आणण्याची केली मागणी

193
ब्रिटनचे उप उच्चायुक्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, जगदंबा तलवार, वाघनखे भारतात आणण्याची केली मागणी
ब्रिटनचे उप उच्चायुक्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, जगदंबा तलवार, वाघनखे भारतात आणण्याची केली मागणी

ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी गुरुवारी (१३ जुलै) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हरजिंदर कांग यांच्याकडे ब्रिटनमधील वस्तुसंग्रहालयातील जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

‘महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिनाचा ३५० वा वर्ष सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील वस्तुसंग्रहालयात असणारी जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभाग पाठपुरावा करीत आहे. तर त्याबाबत सहकार्य करावे.’ असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हरजिंदर कांग यांना केले.

(हेही वाचा – नवाब मलिकांचा तुरूंगातील मुक्काम वाढला; ‘या’ कारणामुळे जामीन देण्यास न्यायालयाचा नकार)

विविध क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी

गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र आणि ब्रिटन दोघांमध्ये वाणिज्यिक संबंध आहेत. ब्रिटन हा भारतातील मोठा गुंतवणूकदार असून त्यातील अनेक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य आहे. पर्यावरण, उत्पादन, शेती, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, अक्षय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यटन, औषधनिर्माण आणि शिक्षण या क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.