Bmc budget 2024 -25 education: महापालिका शिक्षण विभागासाठी यंदा केवळ १५० कोटींचाच अधिक निधी

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०२४-२५ चा अर्थसंकल्पीय अंदाज अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांना सादर केला.

139
BMC Budget 2024-25 : महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत काय आहेत प्रतिक्रिया, जाणून घ्या
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या शिक्षणासाठी यंदा केवळ १५० कोटींची अधिक वाढ करण्यात आलेली असून मागील वर्षी जाहिर करण्यात आलेल्या ३३४७ कोटी रुपयांच्या तुलनेत आगामी वर्षांच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात केवळ २४९७ कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे प्रशासनाचे अधिक लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहेण् विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षांत तरतूद केलेल्या ३३४७ कोटी रुपयांच्या तुलनेत ३२ ०३ कोटी रुपयांची सुधारीत तरतुद केली आहे त्यामुळे सुधारीत अर्थसंकल्पाच्या तुलनेतही शिक्षण विभागाला सुंमारे ३०० कोटी रुपयांचीच वाढ मिळाली आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०२४-२५ चा अर्थसंकल्पीय अंदाज अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांना सादर केला. ३४९७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजात शिक्षण विभागाने महानगरपालिकेच्या २५ माध्यमिक शाळांमध् इंटरनेटच्या सुविधेसह ०४ संगणकांमार्फत ई-वाचनालये सुरु करण्यात आली आहेत. त्यान धर्तीवर महानगरपालिकेच्या ५० प्राथमिक शाळांमध्ये ई-वाचनालये सुरु करण्यात येणार असल्याचे नमुद केले आहे.

(हेही वाचा – Cyber Attack On Air Force: हवाई दलावर सायबर हल्ला, कॉम्प्युटर सिस्टिम हॅक करण्याचा प्रयत्न )

मुंबई महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, तेलगू, तमिळ व कन्नड अशा आठ माध्यमांच्या ९४३ प्राथमिक शाळेतील एकूण २,४४,१५२ विद्यार्थ्यांना ७,८३४ शिक्षकांमार्फत मोफत शिक्षण दिले जात आहे. महानगरपालिकेच्या २४८ माध्यमिक शाळेतील एकूण ४३,०४० विद्यार्थ्यांना (मुले २१,९१० व मुली २१,१३०) १,२१४ शिक्षकांमार्फत मोफत शिक्षण दिले जात आहे. याशिवाय महानगरपालिकेतर्फे विशेष मुलांसाठी १८ विशेष शाळा सुरु असून या शाळांमधून एकूण ८१३ विद्यार्थ्यांना (मुले ५७१ व मुली २४२) ७७ शिक्षकांमार्फत शिक्षण दिले जात आहे. तसेच महानगरपालिकेतर्फे ०२ अध्यापक विद्यालये व ०३ कनिष्ठ महाविद्यालये चालविली जातात ज्यामधून एकूण ४८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

महानगरपालिकेकडून अनुदान दिल्या जाणा-या ३८७ खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकूण २,६७९ शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांमधून इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी पर्यंत एकूण १,०३,७८८ विद्यार्थी (मुले ५१,५०९ व मुली ५२,२७९) शिक्षण घेत आहेत. तर महानगरपालिकेमार्फत सद्यस्थितीत बालवाडीचे ९०० वर्ग, एमपीएसचे ११० वर्ग, सीबीएसई, आयसीएसई, आयबी व आयजीसीएसई मंडळांचे ८७ वर्ग असे एकूण १,०९७ पूर्व प्राथमिक वर्ग सुरु आहेत. त्यामध्ये एकूण ४२,९१९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

खेळातून शिक्षणाकडे
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत वापरात येणार तंत्रज्ञानामधील नवनवीन बदलांचा विचार करुन खेळातून शिक्षण या संकल्पनेवर आधारित ‘Gamified Learning App’ ही सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमिक मार्गदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या एकूण १९,४०१ टॅबमध्ये नव्याने उपलब २३,५६९ करुन देण्यात येत आहे. या टॅबमधील ऍपद्वारे मुलांना खेळातून शिक्षणाची रुची निर्माण होणार आहे.

पुढील वर्षांत २१ शाळांच्या दुरुस्तीची कामे होणार पूर्ण
महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या एकूण ४७९ शालेय इमारती आहेत. सन २०२२-२३ वर्षातील दुरुस्ती व दर्जान्नतीची २९ कामे व सन २०२३-२४ वर्षामध्ये ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत शाळांची दुरुस्तीची १२ कामे अशी एकूण ४१ कामे सुरु आहेत. त्यापैकी मार्च २०२४ पर्यंत एकूण २० कामे पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित २१ कामे पुढील आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येतीलअसे नमुद करण्यात आली आहे.

शाळांमध्ये क्रीडा संकुल
मुंबईतील शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर आदी ठिकाणी प्रत्येकी एक अशाप्रकारे एकूण ०३ क्रीडा संकुले उभारण्यात येणार आहे. यामध्ये पूर्व उपनगरातील विक्रोळी वर्षानगर इंग्रजी महापालिका शाळा, कांदिवलीतील एम जी रोड पब्लिक स्कूल, तसेच शहरातील माटुंगा तेलंग रोड मुंबई पब्लिक स्कूल आदी ठिकाणी तीन क्रीडा संकुले उभारण्यात येणार आहे. यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.