India-US Trade Deal : ५०० अब्ज डॉलर्सचा करार! पुढील पाच वर्षांत ऊर्जा आणि तंत्रज्ञानात परिवर्तन

India-US Trade Deal :        भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराची चौकट अंतिम झाली आहे.(India-US Trade Deal)

112
Hands painted with Indian and American flags shaking hands.
A symbolic handshake representing the India-US trade deal.

India-US Trade Deal :        भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराची चौकट अंतिम झाली आहे.(India-US Trade Deal) दोन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन जारी केले असून भारत पुढील पाच वर्षांत अमेरिकेकडून ऊर्जा, खनिजे, तंत्रज्ञान उत्पादने व विमानांचे सुटे भाग खरेदी करेल. भारत-अमेरिका व्यापार कराराची एकूण किंमत ५०० अब्ज डॉलर्स आहे. या करारात बाजारपेठेत प्रवेश वाढविणे व पुरवठा साखळी मजबूत करणे देखील समाविष्ट आहे.(India-US Trade Deal)

(हेही वाचा Pakistan Threatening India : आग्रा पेटवू तर दिल्ली हादरवू; दहशतवादी संघटनांची दर्पोक्ति )

ऊर्जा क्षेत्रात मोठी तेजी शक्य

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने या करारांतर्गत विशिष्ट ऊर्जा उत्पादने किंवा प्रमाणासंदर्भात तपशीलवार माहिती दिली नाही. परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्यात पारंपारिक कच्चे तेल, शेल तेल व वायू, द्रवीभूत नैसर्गिक वायू(एलएनजी) व कोकिंग कोळसा यांचा समावेश असू शकतो. एका वरिष्ठ विश्लेषकाने सांगितले की, या ऊर्जा उत्पादनांची गुणवत्ता, तंत्रज्ञान व किमतीबद्दल अधिक तपशील अद्याप प्रलंबित आहेत.(India-US Trade Deal)

गेल्या आर्थिक वर्षात, भारताने एकूण २४३ दशलक्ष टन कच्चे तेल आयात केले, ज्याचे मूल्य अंदाजे १३७ अब्ज डॉलर्स इतके आहे. अमेरिकेतून कच्च्या तेलाची आयात झपाट्याने वाढली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत, जवळपास १३ दशलक्ष टनांवर पोहोचली असून २०२४ मधील याच कालावधीतील ७.१ दशलक्ष टनांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. गेल्या दोन महिन्यांत हे आणखी वाढले असून जानेवारीत अमेरिकेतून दररोज २१८,४०० बॅरल कच्चे तेल येत होते, तर डिसेंबरमध्ये ते फक्त ७०,६०० बॅरल प्रतिदिन होते. यामुळे अमेरिका भारताचा पाचवा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे.(India-US Trade Deal)

तेल आयात वाढविण्याचीही चर्चा

द्विपक्षातील अंतरिम करारामुळे व व्हेनेझुएलामधून कच्च्या तेलाच्या उपलब्धतेमुळे, भारत-अमेरिका तेल व्यापारात लक्षणीय वाढ होऊ शकते. विशेषतः रशियाकडून आयात कमी करतानाच अमेरिकेतून वाढत्या तेल आयातीला काही आव्हानांनाही तोंड द्यावे लागेल. भारताच्या तेल आयातीपैकी सध्या रशियाचा वाटा सुमारे ३० टक्के आहे, जो २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी फक्त २-३ टक्के होता. रशियन तेल सवलतीत उपलब्ध आहे, तर अमेरिकेतून ते आयात करण्यासाठी मालवाहतूक व लॉजिस्टिक्स खर्च जास्त येतो.(India-US Trade Deal)

शिवाय, भारतीय रिफायनरीज बहुतेकदा रशियन मध्यम-सॉर क्रूड(उच्च-सल्फर) सह उत्तम प्रकारे चालतात, तर अमेरिकन क्रूड सामान्यतः हलके(कमी-सल्फर) असते. हे घटक लक्षात ठेवले पाहिजेत. तज्ज्ञांचे म्हणण्यांनुसार, हा करार दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना एक नवीन दिशा देऊ शकतो. परंतु, ऊर्जा आयात निर्णयांमध्ये किंमत, गुणवत्ता व पुरवठा स्थिरता हे प्रमुख घटक राहतील.(India-US Trade Deal)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.