तीन दशकांत २७ हवाई कंपन्यांना उतरती कळा

174
तीन दशकांत २७ हवाई कंपन्यांना उतरती कळा
तीन दशकांत २७ हवाई कंपन्यांना उतरती कळा

सुमारे तीन दशकांपूर्वी खासगी विमान कंपन्यांना आकाशभरारी खुली केली गेल्यापासून, सरासरी ‘एक’ या दराने दरसाल एक कंपनी या व्यवसायातून बाहेर फेकली गेल्याचे आढळून आले आहे.

वाडिया समूहाच्या मालकीची आणि आर्थिक चणचणीचा सामना करीत असलेली ‘गो फस्ट’ ही यातली ताजी भर ठरेल. मागच्या १७ वर्षांहून अधिक काळ उड्डाण करत असलेल्या या कंपनीने मंगळवारी दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला. बुधवारपासून या कंपनीची पुढील तीन दिवसांसाठी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

(हेही वाचा – Unseasonal Rain : संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याच्या टेबलावर फेकले सडलेले कांदे)

खासगी विमान कंपन्यांना देशांतर्गत उड्डाणाला सर्वप्रथम १९९४ मध्ये परवानगी देण्यात आली होती. त्या वर्षापासून अधिकृत आकडेवारीनुसार किमान २७ विमान कंपन्या एकतर बंद करण्यात आल्या किंवा त्यांचे अधिग्रहण किंवा अन्य कंपन्यांमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.

कोणत्या कंपन्या होत्या?

किंगफिशर एअरलाईन्स (२०१२)
एअर कार्निवल प्रायव्हेट लिमिटेड (२०१७)
एअर पेगासस प्रायव्हेट लिमिटेड (२०१७)
रेलिगअर एव्हिएशन लिमिटेड (२०१७)
एअर कोस्टा (२०१७)
क्विकजेट कार्गो एअरलाइन्स (२०१७)
डेक्कन कार्गो अँण्ड एक्सप्रेस लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड (२०१४)
आर्यन कार्गो एक्सप्रेस (२०११)
पॅरामाउंट एअरवेज (२०१०)
एमडीएलआर एअरलाइन्स प्रायव्हेट लिमिटेड (२००९)
जगसन एअरलाइन्स लिमिटेड (२००८)
इंडस एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड (२००७)
एनईपीसी मायकॉन लिमिटेड (१९९६)
लुप्ताना कार्गो इंडिया प्रा. लिमिटेड (२०००)
जेट एअरवेज (२०१९)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.