wtc final 2023 ind vs aus india : भारताला ‘अजिंक्य’ होणे शक्य! ‘विराट’ खेळीची आवश्यकता; इतिहास आहे साक्षी

भारतीय शिलेदार हे आव्हान पार करतील अशी चाहत्यांना आशा आहे.

96

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याचा रविवार, ११ जून हा अखेरचा आणि निर्णायक दिवस आहे. भारतीय संघाला विजयासाठी २८० धावांची आवश्यकता आहे. रोहितसेनेच्या हातात ७ विकेट असले तरी समोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. कारण इंग्लिश खेळपट्टीवर नेहमीच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा वरचष्मा राहिला आहे. भारतासमोर आव्हान मोठे असले तरी अशक्य असे काही नाही. लक्षणीय बाब म्हणजे अखेरच्या दिवशी एवढ्या धावा करणे आणि संपूर्ण दिवसभर खेळणे कठीण आहे. पण भारतीय शिलेदार हे आव्हान पार करतील अशी चाहत्यांना आशा आहे.

आज भारताने शानदार फलंदाजी केली तर ४४४ धावांचे डोंगराएवढे आव्हान पार करण्यात संघाला यश येईल. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया २००१ या कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४४५ धावा केल्या आणि भारताला १७१ धावांवर सर्वबाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला फॉलोऑनसाठी बोलावले. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात व्हीव्हीएस लक्ष्मण (२८१) आणि राहुल द्रविड (१८०) यांनी कांगारूंना जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्यासमोर ३८४ धावांचे लक्ष्य ठेवले. यानंतर हरभजन सिंगने दुसऱ्या डावात ६ बळी घेत उल्लेखणीय कामगिरी केली आणि भारताने तो सामना जिंकला.भारत विरूद्ध इंग्लंड १९७१ ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडने ७१ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर भागवत चंद्रशेखरने ६ बळी घेत इंग्लंडला १०१ धावांत सर्वबाद केले. यानंतर टीम इंडियाने ओव्हलवर हा कसोटी सामना सहज जिंकला.

या कसोटी सामन्यात रिकी पाँटिंगच्या द्विशतकामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५५६ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात टीम इंडिया ५२३ धावा करू शकली, ज्यात राहुल द्रविड (२३३) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (१४८ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला १९६ धावांत सर्वबाद केले आणि २३० धावांचे लक्ष्य सहज पार केले. भारत विरुद्ध वेस्ट इंडीज,१९७६ मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने चौथ्या डावात भारतासमोर ४०३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडिया ४०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकणार नाही असे सर्वांना वाटत होते. मात्र, सुनील गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्या शतकांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला. आजतागायत भारताने चौथ्या डावात एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केलेला नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गाबा कसोटी २०२०-२१ या कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत ३६९ धावा करू शकला. यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला २९४ धावांवर रोखले. यानंतर भारताने ३६२ धावांचे लक्ष्य सहज पार केले. सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवल्यास हा देखील एक अविस्मरनीय सामना होईल. कारण भारतासमोर तब्बल ४४४ धावांचे लक्ष्य आहे.

(हेही वाचा Monsoon : मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण, जाणून घ्या राज्यात केव्हा बरसणार मान्सून सरी?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.