WPL 2024 : मुंबई इंडियन्सची गुजरात जायंट्सवर ५ गडी राखून मात

हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर यांची शानदार भागिदारी

135
WPL 2024 : मुंबई इंडियन्सची गुजरात जायंट्सवर ५ गडी राखून मात
WPL 2024 : मुंबई इंडियन्सची गुजरात जायंट्सवर ५ गडी राखून मात
  • ऋजुता लुकतुके

डब्ल्यूपीएल मधील रविवारचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या संघाविरुद्धचा सामना कमी धावांचा ठरला. पहिली फलंदाजी करत गुजरात संघाने जेमतेम ९ बाद १२६ धावा केल्या. आणि मुंबईच्या संघाचीही या धावांचा पाठलाग करताना दमछाक झाली. अखेर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमेरिया केर यांनी अर्धशतकी भागिदारी करत मुंबईला जिंकून दिलं. हरमन ४६ धावांवर नाबाद राहिली. तर अमेलियाने ३१ धावा केल्या. (WPL 2024)

दोघांनी चौथ्या गड्यासाठी ६६ धावांची भागिदारी केली. एरवी यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज अशा दोघी ७ धावा करुन बाद झाल्या. आणि मग नॅट ब्रंट २२ धावांवर बाद झाल्यावर तर मुंबईची अवस्था ३ बाद ४९ अशी झाली होती. पण, हरमनप्रीत आणि अमेरियाने डाव सावरला. आणि ४८ चेंडूंत ६६ धावांची भागिदारी केली. त्यामुळे मुंबईसाठी विजय दृष्टिपथात आला. (WPL 2024)

(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मराठा तरुणांच्या आत्महत्येमागे जरांगे पाटलांची ‘ती’ भाषा कारणीभूत; अजय महाराज बारस्कर यांचा गंभीर आरोप )

गुजरातच्या डावात त्यांना १२५ धावांत रोखण्याचं कामही अमेरिया केरनेच केलं. शबनम इस्माईलने बेथ मूली (२४), वेदा कृष्णमूर्ती (०) आणि हरलीन देओल (८) यांना लागोपाठ बाद करत गुजरातची अवस्था ३ बाद ३७ अशी केली. त्यानंतर लिचफिल्ड आणि हेमलताही झटपट बाद झाल्या. आणि या धक्क्यातून गुजरातचा संघ सावरलाच नाही. मधली फळी आणि तळाचे फलंदाज अमेरिया केरने कापून काढले. तिने ४ षटकांत १७ धावा देत ४ बळी मिळवले. (WPL 2024)

दहाव्या क्रमांकावरील खेळाडू तनुजा कन्वरच्या २८ धावा ही गुजरातच्या डावातील उच्चांकी धावसंख्या ठरली. त्या खालोखाल कॅथरिन ब्रेसने १५ धावा केल्या. फक्त ४ फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. ३१ धावा आणि ४ बळी अशा अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अमेरिया केरलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला. (WPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.