World Indoor Cricket Cup : जागतिक इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारत गुणतालिकेत अव्वल

World Indoor Cricket Cup : ८ खेळाडू आणि ४ षटकांचे इनडोअर सामने हे जगभरात प्रसिद्ध आहेत 

126
World Indoor Cricket Cup : जागतिक इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारत गुणतालिकेत अव्वल
World Indoor Cricket Cup : जागतिक इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारत गुणतालिकेत अव्वल
  • ऋजुता लुकतुके

जागतिक इनडोअर क्रिकेट (World Indoor Cricket Cup) महासंघाच्या वतीने सध्या इंग्लंड-एशिया कप इनडोअर (England-Asia Cup Indoor) क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची चमकदार कामगिरी भारताला गुणतालिकेत अव्वल स्थानावर घेऊन गेली असून भारतीय पुरुष संघाने श्रीलंका (Sri Lanka) डेव्हलपमेंट व सिंगापूरला दणका देत हे स्थान काबीज केले आहे. (World Indoor Cricket Cup)

(हेही वाचा- Pune Car Accident: पिझ्झा पार्टी, ब्लड रिपोर्टसंबंधी CP Amitesh Kumar यांची स्पष्टोक्ती)

इनडोअर क्रिकेट मध्ये ८ खेळाडू मैदानात खेळतात व प्रत्येक जोडीला ४ षटके फलंदाजी करावी लागते. तर या दरम्यान बाद झालेल्या प्रत्येक खेळाडू बदल्यात संघाला ५ धावा गमवाव्या लागतात.  (World Indoor Cricket Cup)

रात्री उशिरा झालेल्या सामन्यात भारतीय (Indian) संघ श्रीलंकेवर (Sri Lanka) विजय मिळवेल असे वाटत असताना श्रीलंकेने जोरदार मुसंडी मारत सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांनी ९९-९९ धावा केल्या व या सामन्यात दोन्ही संघांना ३.५ गुण मिळाले. (World Indoor Cricket Cup)

(हेही वाचा- मुघलांच्या इतिहासाची भलावण करणाऱ्या Sharad Pawar यांना भगवद्गीता आणि मनाचे श्लोक डोळ्यांत खुपतायेत…)

त्या नंतरच्या सामन्यात भारताने (Indian) श्रीलंका (Sri Lanka) डेव्हलपमेंट संघाचा ५२ धावांनी पराभव केला. या सामन्यात  भारताने प्रथम फलंदाजी करताना ११५ धावा केल्या तर श्रीलंका डेव्हलपमेंट संघाला भारताने (Indian) १६ षटकात ६३ धावांत रोखत या सामन्यात ७ गुणांची कमाई  केली. या सामन्यात भारताच्या दैविक राय व एम. मल्लिकार्जुन प्रत्येकी (१६ धावा , २ बळी), विजय गौडा (१५ धावा व २ बळी), अफरोज पाशा (२१ धावा ), धनुष भास्कर (१२ धावा व ३ बळी) तर अधिराज जोहरी (१२ धावा ) यांनी विजयात धमाकेदार कामगिरी केली. (World Indoor Cricket Cup)

सिंगापूर (Singapore) विरुध्द झालेल्या सामन्यात भारताने पहिल्या १६ षटकात सिंगापूरला (Singapore) १३ धावांत रोखत सहज विजयाचे ध्येय ठवले मात्र भारताने १६ षटकात १४३ धावा चोपून काढत १३० धावांनी विजय साजरा करत या सामन्यात सुध्दा ७ गुणांची कमाई करत गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवले आहे. या सामन्यात विजय गौडा (१६ धावा व ४ बळी), अफरोज पाशा (२७ धावा, २ बळी), दैविक राय( २२ धावा , १ बळी), अधिराज जोहरी (२२ धावा १ बळी) यांनी जोरदार कामगिरी केली. (World Indoor Cricket Cup)

(हेही वाचा- Maharashtra legislative Election : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची नवीन तारीख जाहीर?)

भारताने आत्तापर्यंत या स्पर्धेत १७.५ गुण मिळवत निर्विवाद वर्चस्व सिध्द केले असून श्रीलंका १६.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर १३ गुणांसह इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे.  (World Indoor Cricket Cup)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.