Viswanathan Anand : कँडिडेट्स कपसाठी विश्वनाथन आनंदचा युवा भारतीय बुद्धिबळपटूंना सल्ला

Viswanathan Anand : स्पर्धेतील कामगिरीपेक्षा आनंदला भारतीय युवा खेळाडूंकडून हवंय सर्वोच्च स्तराशी जुळवून घेण्याचं कसब.

87
Viswanathan Anand : कँडिडेट्स कपसाठी विश्वनाथन आनंदचा युवा भारतीय बुद्धिबळपटूंना सल्ला
  • ऋजुता लुकतुके

बुद्धिबळातील मानाच्या कँडिडेट्स चषक स्पर्धेसाठी भारताच्या विदिथ गुजराथी, आर प्रग्यानंदा आणि डी गुकेश हे युवा खेळाडू पात्र ठरले आहेत. पण, या खेळाडूंनी जिंकण्यासाठी खेळण्यापेक्षा सुरुवातीला सर्वोच्च स्तरावरील स्पर्धेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा आणि ते कसब शिकावं, असं भारताचा माजी जगज्जेता खेळाडू विश्वनाथन आनंदने म्हटलं आहे. (Viswanathan Anand)

भारतीय खेळाडूंकडे तारुण्याचा सळसळता उत्साह असला तरी अशा स्पर्धेसाठी लागणार अनुभव नाही, त्यामुळे गुकेश, प्रग्यानंदा आणि विदिथ यांनी आधी तिथल्या स्पर्धेशी जुळवून घ्यावं, असं आनंदने म्हटलं आहे. येत्या ३ तारखेपासून कॅनडाच्या टोरँटोमध्ये कँडिडेट्स चषक स्पर्धा होणार आहे. ती २२ एप्रिलपर्यंत चालेल. या स्पर्धेतूनच जगज्जेत्याचा आव्हानवीर ठरवला जातो. त्यामुळे या स्पर्धेचं महत्त्व मोठं आहे. (Viswanathan Anand)

(हेही वाचा – Maharashtra Public Service Commission: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ८७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा)

‘भारतीयांसाठी ही मोठी संधी आहे. जागतिक स्पर्धा जाणून घेण्याची. हा अनुभव पुढे त्यांना महत्त्वाचा ठरणार आहे. तेव्हा या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आधी जुळवून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि मग संधी मिळाली तर मोठ्या संधीच्या मागे लागता येईल. सध्या युवा खेळाडूंनी सामन्यांवर लक्ष केंद्रीत करावं. मोठे विजय नंतर मिळवता येतील,’ असं आनंदने एका वेबकास्टवर बोलून दाखवलं आहे. (Viswanathan Anand)

सहभागी होणाऱ्या तीन भारतीयांपैकी आनंदला अनुभव आणि उत्साह असलेल्या विदिथ गुजरातीकडून आशा आहेत. या स्पर्धेत कोण बाजी मारेल यावर बोलताना आनंदने दोन नावं घेतली. ‘फाबियानो करुना आणि हिकारू नाकामुरा यांच्याकडून मला विजेतेपदाच्या आशा आहेत,’ असं आनंद म्हणाला. आनंद बरोबरच मॅग्नस कार्लसननेही भारताचा सर्वोत्तम खेळाडू विदिथ गुजराथी ठरेल असा अंदाज व्यक्त केला आहे. (Viswanathan Anand)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.