IPL 2024 : कोलकाताचा १७ एप्रिलचा सामना पुढे ढकलणार की, जागा बदलणार?

IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सचा संघ १७ एप्रिलला राजस्थान रॉयल्सशी घरच्या मैदानावर भिडणार आहे. 

97
IPL Mega Auction : संपूर्ण लिलावापूर्वी संघांना ४ ऐवजी ८ खेळाडू राखून ठेवता येणार?
  • ऋजुता लुकतुके

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान १७ एप्रिलला ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्याचा दिवस बदलावा लागेल, असं बंगाल क्रिकेट असोसिएशनने (Bengal Cricket Association) बीसीसीआयला कळवलं आहे. बंगाल असोसिएशन या सामन्याचे यजमान आहेत. पण, त्या दिवशी राम नवमी असल्यामुळे कोलकाता पोलिसांनी सामन्याच्या ठिकाणी बंदोबस्त पुरवण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. इतकंच नाही तर १९ एप्रिलला बंगालमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठीचं पहिल्या टप्प्याचं मतदानही होणार आहे. तर कोलकात्यात १ जूनला मतदान होणार आहे. (IPL 2024)

‘१७ तारखेचा सामना राम नवमीच्या दिवशी येत असल्यामुळे आणि आधीच निवडणुकीची धामधूम असल्यामुळे या सामन्यासाठी आम्ही पुरेसा बंदोबस्त पुरवू शकत नाही,’ असं कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (Bengal Cricket Association) अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांना कळवलं आहे. यावर बंगाल क्रिकेट असोसिएशननेही विचार करून बीसीसीआयसमोर दोन प्रस्ताव ठेवले आहेत. १७ एप्रिलचा सामना एकतर १६ तारखेला घेता येईल किंवा एका दिवसाने पुढे ढकलून १८ तारखेला घेण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे. (IPL 2024)

(हेही वाचा – IPL 2024, K L Rahul : के एल राहुल बंगळुरू विरुद्ध खेळणार का यावर अजूनही प्रश्नचिन्ह)

बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला बंगाल असोसिएशनच्या प्रस्तावाची माहिती दिली आहे. ‘सामन्याचा दिवस जरी बदलला तरी बीसीसीआय (BCCI) आणि संघातील खेळाडू आणि प्रशासनासाठी खूप बदल होतात. खेळाडूंचा प्रवास, हॉटेल, सरावाच्या वेळा असा अख्खा कार्यक्रम बदलावा लागतो. त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करून याविषयी निर्णय घेऊ,’ असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं. १८ तारखेला सामना भरवणं कठीण जाऊ शकतं. कारण, १९ तारखेला कोलकाताच्या आजूबाजूचा कूच बिहार, अलीपूर आणि जलपायगुरी या भागांत मतदान होणार आहे. (IPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.