Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत विराट कोहली निर्णायक भूमिका बजावेल, कॅलिसला विश्वास

भारताला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करायची असेल तर विराटमुळेच ते शक्य आहे असं, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने बोलून दाखवलं आहे. 

153
Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत विराट कोहली निर्णायक भूमिका बजावेल, कॅलिसला विश्वास
Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत विराट कोहली निर्णायक भूमिका बजावेल, कॅलिसला विश्वास
  • ऋजुता लुकतुके

भारताला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करायची असेल तर विराटमुळेच (Virat Kohli) ते शक्य आहे असं, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने बोलून दाखवलं आहे. (Virat Kohli)

भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा नेहमीच खडतर मानला जातो. आतापर्यंत भारताने ८ वेळा आफ्रिकेचा दौरा केला आहे. पण, यात एकदाही भारताला इथं कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यंदा मात्र आयसीसी (ICC) क्रमवारीत सातत्याने अव्वल स्थान राखलेला भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत उतरणार आहे. (Virat Kohli)

(हेही वाचा – Ind vs SA T20 Series : पहिला सामना पावसात गेला वाहून, कर्णधार सुर्यकुमारचं संघाला ‘फिअरलेस’ क्रिकेट खेळण्याचं आवाहन)

पण, भारतीय संघाला विजयी कामगिरी करायची असेल तर विराट कोहलीला (Virat Kohli) महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असं माजी अष्टपैलू आफ्रिकन खेळाडू जॅक कॅलिसने म्हटलं आहे. एकतर आताच्या संघातील रोहित आणि विराटचा अपवाद वगळता इतर खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेत खेळण्याचा फारसा अनुभव नाही आणि इथल्या कमी-अधिक उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचं आव्हानही वेगळं आहे.

पण, विराट कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंत आफ्रिकेत खेळलेल्या १४ डावांमध्ये ५५ धावांच्या वरच्या सरासरीने ७१९ धावा केल्या आहेत. यात २ शतकं आणि ३ अर्धशतकंही त्याने ठोकली आहेत. एकदिवसीय विश्वचषकातील यशस्वी कामगिरीनंतर सुटी घेऊन तो पुन्हा मैदानात उतरत आहे. अशावेळी तो नव्या दमाने आफ्रिकेतील आव्हानाला सामोरं जाईल आणि हीच विराटची जमेची बाजू कॅलिसला वाटते. (Virat Kohli)

(हेही वाचा – Ind vs SA T20 Series : मार्करम आणि सुर्यकुमार यांनी जेव्हा फ्रीडम मालिकेच्या चषकाचं अनावरण केलं )

स्टार स्पोर्ट्स वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कॅलिस म्हणतो, ‘विराट (Virat Kohli) एक कसलेला फलंदाज आहे. तो कुठेही खेळत असला तरी त्याच्यातील गुणवत्ता लपत नाही. मैदान कुठलंही असो, तो सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी समर्थ आहे. या आधीही त्याने दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी केली आहे. आता त्याला संघातील युवा खेळाडूंनाही आपलं ज्ञान वाटायचं आहे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घ्यायची आहे.’ (Virat Kohli)

(हेही वाचा – Ind W vs Eng W T20 : इंग्लिश महिलांविरुद्ध तिसरा टी-२० सामना जिंकून भारताने व्हाईटवॉश टाळला )

भारताला दक्षिण आफ्रिकेत जिंकायचं असेल तर विराट कोहलीला (Virat Kohli) चांगली कामगिरी करावी लागेल, असं कॅलिसला मनापासून वाटतं. ‘तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळण्याचं आव्हान त्यालाही खुणावत असणार. अशावेळी तोच मालिकेत निर्णायक ठरेल,’ असं कॅलिस पुन्हा एकदा म्हणाला. (Virat Kohli)

कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यातील पहिली कसोटी सेंच्युरियन तर दुसरी कसोटी केपटाऊनला होणार आहे. यातील केपटाऊनचं मैदान थोडंफार फिरकीला साथ देणारं आहे. (Virat Kohli)

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.