‘Virat Kohli Spat on Me’ : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डीन एल्गरने विराट कोहली त्याच्यावर थुंकल्याची करुन दिली आठवण

डीन एल्गरच्या म्हणण्याप्रमाणे ही गोष्ट २०१६ मधली आहे. आणि नंतर विराटने माफीही मागितली होती.

309
‘Virat Kohli Spat on Me’ : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डीन एल्गरने विराट कोहली त्याच्यावर थुंकल्याची आठवण काढली आहे
  • ऋजुता लुकतुके

दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटी कर्णधार डीन एल्गरने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीविषयी (Virat Kohli) एक धक्कादायक आठवण अलीकडेच उघड केली आहे. विराट कोहली (Virat Kohli) भारतातील एका कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या दिशेनं थुंकला होता, असं एल्गरचं म्हणणं आहे. आणि पुढे २ वर्षांनी बंगळुरू रॉयल चँलेंजर्स संघातील विराटचा (Virat Kohli) सहकारी एबी डिव्हिलिअर्सने विराटला (Virat Kohli) याबद्दल विचारल्यावर त्याने माफीही मागितली, असंही एल्गरने म्हटलं. (‘Virat Kohli Spat on Me’)

एल्गरने अलीकडेच भारताच्या आफ्रिका दौऱ्या दरम्यान दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलं होतं. आणि नंतर तो निवृत्त झाला. एका पॉडकास्टमध्ये एल्गरने विराट (Virat Kohli) विषयीचा हा किस्सा सांगितला आहे. प्रकरण २०१५ मधील आहे. एल्गरचे त्या कसोटीत अश्विन, जडेजा आणि विराट (Virat Kohli) बरोबर वारंवार खटके उडत होते. (‘Virat Kohli Spat on Me’)

 

View this post on Instagram

 

A post shared by Smash Sports (@smashsportsinc)

त्या प्रसंगाचं वर्णन करताना एल्गर पॉडकास्टमध्ये म्हणाला, ‘आमचे सतत वाद सुरू होते. एकदा तर विराट कोहली (Virat Kohli) माझ्या दिशेनं बघून थुंकला. मी त्याच्या दिशेनं बॅट उगारली. आणि असं पुन्हा केलंस तर बॅटने तुला इंगा दाखवेन असं म्हणत मी एक दक्षिण आफ्रिकन शिवीही दिली,’ असं एल्गर म्हणाला. (‘Virat Kohli Spat on Me’)

(हेही वाचा – UNESCO : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी मराठ्यांच्या १२ किल्ल्यांच्या नावांची तरतूद)

यावर पॉडकास्टमध्ये मुलाखत घेणाऱ्याने ती शिवी विराटला (Virat Kohli) कळली का, असंही विचारलं. यावर एल्गर पुढे म्हणतो, ‘आयपीएलमध्ये (IPL) बंगळुरू संघात तो आणि एबी डिव्हिलिअर्स एकत्र खेळतात. त्यामुळे विराटला (Virat Kohli) माहीत होतं. पुढे डिव्हिलिअर्सने विराटला त्याबद्दल विचारलंही होतं. आणि विराटने त्याच्याकडे माफी मागितली.’ (‘Virat Kohli Spat on Me’)

तेव्हाच्या प्रसंगानंतर एल्गर आणि विराट (Virat Kohli) यांच्यातील संबंध सुधारले असावेत इतकं नक्की. कारण, एल्गर आपला शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला, तेव्हा विराटनेच त्याचा झेल टिपला होता. पण, विराटने कुठल्याही प्रकारे आनंद साजरा केला नाही. उलट एल्गरला धावत जाऊन मिठी मारली. (‘Virat Kohli Spat on Me’)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.