Atal Setu : अटल सेतूला मुंबईकरांची पसंती; आतापर्यंत ‘इतका’ टोल वसूल

Atal Setu : 21 किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूवरून दररोज 30 हजार वाहने ये-जा करत आहेत. या सेतूवरील टोलच्या माध्यमातून 10 दिवसांत 61 लाख 50 हजार रुपयांचा महसूल एमएमआरडीएला मिळाला आहे.

251
Atal Setu : अटल सेतूला मुंबईकरांची पसंती; आतापर्यंत 'इतका' टोल वसूल
Atal Setu : अटल सेतूला मुंबईकरांची पसंती; आतापर्यंत 'इतका' टोल वसूल

शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळे (Shivdi-Nhava Sheva Sea Bridge) मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचला आहे. पूर्वी मुंबईतून नवी मुंबईमार्गे पनवेलपर्यंत प्रवास करण्यासाठी दीड-दोन तास वेळ लागत असे. आता त्याच प्रवासासाठी केवळ पंधरा मिनिटे लागतात. त्यामुळे दूरवरच्या प्रवासासाठी या सेतूच्याच वापराला प्राधान्य दिले जाते. (Atal Setu)

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून रवींद्र जडेजा आणि के एल राहुलची माघार)

दररोज 30 हजार वाहनांची ये-जा 

रायगड जिल्ह्यातील उरण-अलिबागसह कोकणात किंवा पुण्यामार्गे दूरचा प्रवास करण्यासाठी मुंबईकर शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूवरूनच (Shivdi Nhava Sheva Atal Setu) प्रवास करत आहेत. 12 जानेवारी रोजी उद्घाटन झालेल्या या सागरी सेतूने प्रवासाच्या वेळेत मोठी बचत झाल्याने मुंबईकर आनंदी आहेत. (Mumbai Trans Harbour Link)

21 किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूवरून दररोज 30 हजार वाहने ये-जा करत आहेत. या सेतूवरील टोलच्या माध्यमातून 10 दिवसांत 61 लाख 50 हजार रुपयांचा महसूल एमएमआरडीएला मिळाला आहे.

येत्या काही दिवसांत या सागरी सेतूवरून येजा करणाऱ्या वाहनांची दैनंदिन संख्या 30 हजारांवरून 70 हजारांपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे.

30 वर्षांसाठी आकारणार पथकर

दक्षिण मुंबईला थेट रायगड (Raigad) जिल्ह्याशी जोडणारा कनेक्टर म्हणून अटल सेतू हा बहुप्रतिक्षित प्रकल्प होता. देशातल्या या पुलावरून प्रवास करण्यासाठी टोल भरावा लागतो. 250 रुपये टोल आकारण्यात येतो. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पाचा एकूण खर्च 21 हजार 200 कोटी रुपये झाला आहे. त्यामुळे सुमारे 30 वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. (Atal Setu)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.