IND VS BAN : विराट कामगिरी! बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीने मोडला ‘हा’ रेकॉर्ड

130

टी-२० विश्वचषकात विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मंगळवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटाने मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. विराट यंदाच्या विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते आणि भारताने हा सामना जिंकला.

( हेही वाचा : 7th Pay Commission : नववर्षात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर! महागाई भत्ता ४२ टक्के होणार ? )

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा महेला जयवर्धनेच्या नावावर होत्या त्याने टी-२० मध्ये १०१६ धावा केल्या होत्या. विराटने हा रेकॉर्ड मोडला आहे. कोहलीला १०१७ धावा करण्यासाठी फक्त १६ धावांची गरज होती. कोहलीने बांगलादेशविरुद्ध फलंदाजी करताना दोन चौकार मारले तेव्हाच विराट विश्वविक्रम करणार याबाबत खात्री झाली.

टी-२० मध्ये सर्वाधिक धावा

कोहलीने बांगलादेशविरुद्ध सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेतली आणि आपला विश्वविक्रम पूर्ण केला. आता क्रिकेट विश्वात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा या विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असल्याने तो किती धावा करतो याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.