Virat Kohli @35 : विराटचा प्रवास जो १५ वर्षांपूर्वी ईडन गार्डन्सवरच सुरू झाला होता…

136
Virat Kohli @35 : विराटचा प्रवास जो १५ वर्षांपूर्वी ईडन गार्डन्सवरच सुरू झाला होता...
Virat Kohli @35 : विराटचा प्रवास जो १५ वर्षांपूर्वी ईडन गार्डन्सवरच सुरू झाला होता...
  • ऋजुता लुकतुके

आज भारताच्या किंग कोहलीचा ३५वा वाढदिवस (Virat Kohli @35) आहे. फार कमी जणांना आठवत असेल क्रिकेटमध्ये किंग होण्याचा त्याचा प्रवास ईडन गार्डन्सवरच सुरू झाला होता

२००९ च्या उकाड्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर क्लब स्तरावरील एक क्रिकेट सामना सुरू होता. पी सेन चषक सामन्यात मोहनबागान संघाने दमदार विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार होता पंजाबी मुंडा विराट कोहली. त्याने ईडन गार्डन्सच्या वळणाऱ्या खेळपट्टीवर १२१ चेंडूंत १८४ धावा केल्या होत्या.

बंगाली फारसं समजत नसल्याने आणि ही कामगिरी पुरेशी नाही अशी भावना मनात असल्याने एकटा विराट कोहली विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही. तो तेव्हा २० वर्षांचा होता. १९ वर्षांखालील टी-२० चषकात त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. आणि त्याच्या कामगिरीची छाप पाडली होती. त्यामुळे क्रिकेटमधील उगवता तारा अशी त्याची ओळख निर्माण झालेली होती; पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जे वाढून ठेवलं होतं, त्याची कल्पना या विशीतल्या मुलाला आली होती. तेव्हा तो पंजाबी घरातला खातापिता मुंडा होता. गाल वर आलेले होते. आणि छोले-भटुऱ्यांचं तेज चेहऱ्यावर होतं. पण, मनात एक प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपल्याला झेपेल का? ५ सामने वरिष्ट गटात भारताकडून खेळून झालेले होते. आता संघात जम बसेल का?

(हेही वाचा –World Cup 2023: तिकिटांची काळाबाजारात विक्री केल्याबाबत कोलकाता पोलिसांत तक्रार )

‘खूप कठीण होता आजचा सामना. असं वाटत होतं, की कधीतरी शरीर जळून जाईल या उकाड्यात,’ तो कसंबसं पत्रकारांना म्हणला होता. पण, त्याच्या मनात धाकधूक होती ही खेळी भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा त्याच्यासाठी उघडले का?

गंमत म्हणजे त्याची आतली हाक निवड समितीने ऐकली. त्याला संघात आणि अंतिम अकराजणांतही संधी मिळाली. आणखी सहा महिन्यांनी तो पुन्हा एकदा ईडन गार्डन्स मैदानावर पॅड्स बांधून उतरला. यावेळी भारताची निळी जर्सी अंगावर होती. आणि समोर श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि मुरलीधरन यांचा मारा होता.

कोहलीने १०७ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विराटचं पहिलं शतक. आताच्या त्याच्या ४८ षटकांमधलं पहिलं शतक. सामना संपल्यानंतर गौतम गंभीरने त्याला कौतुकानं सामनावीराचा धनादेश दिला. या सगळ्या गोष्टी विराटच्या नीट लक्षात आहेत. ईडन गार्डन्सला तो म्हणूनच विसरलेला नाही. इथले ६०,००० च्या वर प्रेक्षक आणि क्रिकेटमय वातावरण त्याला आवडतं. रविवारी तो पुन्हा एकदा इथं खेळायला उतरेल. बंगाल क्रिकेट असोसिएशनने विराटच्या चाहत्यांना द्यायला ७०,००० विराटच्या चेहऱ्याचे मुखवटे तयार केले आहेत. मैदानात येताना प्रत्येकाला तो मुखवटा देण्याचा त्यांचा इरादा आहे.

स्वत: कोहली मात्र शांत आहे. तुझे वाढदिवसाचे प्लान्स काय आहेत, असं परवाच त्याला पत्रकारांनी विचारलं. आणि नेहमीच्या शैलीत तो म्हणाला, ‘सगळं होईल. पण, विश्वचषक स्पर्धेनंतर.’ तेव्हा विराटसमोर सध्या एकच लक्ष्य आहे विश्वचषक स्पर्धेचं. आतापर्यंत विराटने ७ सामन्यांमध्ये ४४२ धावा केल्या आहेत. त्याची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे १०३ नाबाद. आणि सरासरी आहे ८८.४० धावांचं.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.