
-
ऋजुता लुकतुके
गेल्यावर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) वजन जास्त भरल्यामुळे अंतिम सामन्याच्या दिवशी कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) अपात्र ठरली होती. तिचं पदक त्यामुळे अखेरच्या क्षणी हुकलं. पण, हरयाणा सरकार (Haryana Govt) तिच्यामागे उभं राहिलं होतं. आधी काँग्रेसकडून ती हरयाणा विधानसभेत निवडूनही आली. त्यानंतर तिथल्या सरकारने तिला ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूसाठी ठरवलेलं बक्षीस देऊ केलं होतं. तिच्यासमोर सरकारी नोकरी, पोलीस दलात भरती आणि ४ कोटी रुपयांचं रोख इनाम असे तीन पर्याय ठेवण्यात आले असता, विनेशने ४ कोटी रुपयांचा पर्याय निवडला होता. त्यावरून ती ट्रोलही झाली होती.
रोख रकमेचा तिने निवडलेला पर्याय काहींना रुचला नव्हता. तर काहींना पदक मिळालेलं नसताना तिला बक्षीस देणंही मान्य नव्हतं. तर अनेकांनी विनेशने (Vinesh Phogat) हे बक्षीस मागून घेतलं, अशी टीका केली होती. या टीकाकारांना विनेशने आपल्या एका ट्विटमधून उत्तर दिलं आहे. ‘दोन – दोन रुपये घेऊन त्या बदल्यात ट्विट करणाऱ्या लोकांनो आणि इंटरनेटवर मोफत ज्जान वाटणाऱ्या लोकांनो! नीट ऐका. मी आतापर्यंत करोडो रुपयांच्या जाहिराती नाकारल्या आहेत. गेमिंगपासून सॉफ्ट ड्रिंकपर्यंत सगळ्या जाहिराती मी नाकारल्या,’ अशी सुरुवात तिने ट्विटमध्ये केली आहे.
2 रुपये लेकर ट्वीट करने वालों और फ्री का ज्ञान बाँटने वालों… ज़रा ध्यान से सुनो!
तुम्हारी जानकारी के लिए बता दूँ — अब तक करोड़ों के ऑफर ठुकरा चुकी हूँ।
सॉफ्ट ड्रिंक्स से लेकर ऑनलाइन गेमिंग तक,
पर मैंने कभी अपने उसूलों का सौदा नहीं किया।
जो कुछ भी हासिल किया है, मेहनत की…— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) April 13, 2025
‘माझ्या तत्त्वांशी मी कधीही प्रतारणा केलेली नाही. मी आतापर्यंत मिळवलेलं सगळं स्वकष्टार्जित आणि जवळच्या लोकांच्या आशिर्वादाने मिळवलं आहे. मला त्याचा अभिमानच आहे. मी अशा देशाची सुपुत्री आहे जिथे आईच्या दूधातूनच आम्हाला आत्मसन्मानाची शिकवण मिळते. हक्क हिसकावून घ्यावे लागत नाहीत, ते जिंकावे लागतात, हे मला पूर्वजांनी शिकवलं आहे. मी संकटात असताना माझे जवळचे माझ्यासाठी धावून येतात. आणि माझे जवळचे संकटात असताना मी त्यांच्यासाठी भिंत बनून उभी राहते, असे संस्कार माझ्यावर आहेत,’ असं शेवटी तिने बोलून दाखवलं आहे.
बक्षीस म्हणजे फक्त पैसा नव्हे. तर त्यात आत्मसन्मान आहे, असं विनेशचं म्हणणं आहे. विनेश (Vinesh Phogat) या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच ५० किलो वजनी गटांत खेळली. तिचा नियमित वजन गट ५५ किलोंचा आहे. पण, अंतिम पनघल या गटासाठी आधीच पात्र ठरल्यामळे तिने वजनी गट बदलला. आणि तिने अंतिम फेरीपर्यंत मजलही मारली होती. पण, अंतिम सामन्यापूर्वी १५० ग्रॅम अतिरिक्त वजनाने तिचा घात केला. आणि तिला अपात्र ठरवण्यात आलं. क्रीडा लवादाकडे तिने मागितलेली दादही फेटाळून लावण्यात आली. अलीकडे विनेशने (Vinesh Phogat) राजकारणात प्रवेश केला असून ती जुलना (Julana) विधानसभा मतदारसंघातून निवडून आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community