Varun Kumar Rape Case : हॉकीपटू वरुण कुमार विरुद्ध बंगळुरू पोलीस करणार चौकशी

हॉकीपटू वरुण कुमारवर एका अल्पवयीन महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे. 

135
Varun Kumar Rape Allegation : हॉकीपटू वरुण कुमारवर राष्ट्रीय कोच फलटन काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय हॉकी संघातील महत्त्वाचा बचावपटू वरुण कुमार (Varun Kumar) विरोधात एका अल्पवयीन मुलीने लग्नाचं वचन देऊन अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मंगळवारी बंगळुरू पोलिसांनी वरुण कुमार (Varun Kumar) विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हाही नोंदवला. आता पोलीस या प्रकरणी पुरावे गोळा करत असल्याचं समजतंय. वरुण आणि या महिलेदरम्यानचे फोन कॉल, संदेश आणि ऑडिओ संदेश यांचा तपास पोलीस करत आहेत. (Varun Kumar Rape Case)

वरुण सध्या भारतीय संघाबरोबर भुबनेश्वरला सराव करत आहे. लवकरच बंगळुरू पोलीस त्याला चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. भारतीय हॉकी फेडरेशनने वरुण संघाबरोबर असून चौकशीसाठी कधीही उपलब्ध होऊ शकेल असं स्पष्ट केलं आहे. ‘आम्ही अजून वरुणशी संपर्क केलेला नाही. तो भुवनेश्वरमध्ये सराव करत असल्याचं आम्हाला कळलं आहे. पण, आम्ही तिथेही आमचे अधिकारी पाठवलेले नाही. सध्या आम्ही पुरावे तपासून पाहत आहोत. वेळ पडल्यावर वरुणला चौकशीत सहभागी करुन घेतलं जाईल,’ असं बंगळुरू पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. (Varun Kumar Rape Case)

(हेही वाचा – Ayodhya Train : अयोध्येत जाणाऱ्या आस्था स्पेशल ट्रेनवर पुण्यात हल्ला)

वरुण कुमारवर केले हे आरोप 

वरुण कुमारला (Varun Kumar) २०२१ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २०२० च्या ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या भारतीय संघात त्याचा समावेश होता. पण, मंगळवारी एका महिलेनं वरुण विरुद्ध फसवणूक आणि अनेकदा बलात्कार केल्याची तक्रार केली आहे. महिला १७ वर्षांची अल्पवयीन असताना वरुणने (Varun Kumar) तिच्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे. त्यामुळे वरुणवर बालकांविरोधातील लैंगिक गुन्हे या कायद्या अंतर्गत कारवाई सुरू आहे. (Varun Kumar Rape Case)

तक्रारदार महिला २०१८ मध्ये पहिल्यांदा वरुणच्या (Varun Kumar) संपर्कात आली. आणि वरुणने काही भेटींतच तिच्याकडे लग्नासाठी मागणी घातल्याचं तिचं म्हणणं आहे. पण, अलीकडे तिने लग्नाची विचारणा करताच वरुणने तिच्याशी संबंध तोडून टाकले. आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची धमकी दिली, असं या महिलेचं म्हणणं आहे. वरुणने (Varun Kumar) अजून या प्रकरणी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि बंगळुरू पोलिसांचा तपास सुरू आहे. (Varun Kumar Rape Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.