Lionel Messi : इंटर मियामीच्या आगामी प्रदर्शनीय सामन्यातही लायनेल मेस्सी बेंचवरच

हाँग काँगमध्ये मेस्सी न खेळल्यामुळे प्रेक्षकांनी त्याची आणि संघ मालक डेव्हिड बेकहमची हुर्यो उडवली होती. 

137
Lionel Messi : अखेर टोकियोतील प्रदर्शनीय सामन्यात मेस्सी खेळला
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकन फुटबॉलचा हंगाम सुरू होण्यापूर्वी लायनेल मेस्सीचा (Lionel Messi) इंटर मियामी संघ सध्या प्रदर्शनीय सामने खेळण्यासाठी आशिया खंडाच्या दौऱ्यावर आहे. पण, आगामी सामन्यातही स्टार खेळाडू लायनेल मेस्सी (Lionel Messi) खेळणार नाही असेच संकेत मिळत आहेत. इंटर मियामी संघाने प्रसिद्ध केलेल्या अकरा खेळाडूंच्या यादीत मेस्सीचं नाव नाही. त्यामुळे तो बेंचवरच असणार हे उघड आहे. (Lionel Messi)

मागच्या रविवारी संघाचा सामना हाँग काँगमध्ये होता. आणि तिथेही मेस्सी (Lionel Messi) न खेळल्यामुळे प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हजारो प्रेक्षकांनी मैदानावर घोषणा दिल्या. आणि विश्वचषक विजेता लायनेल मेस्सी आणि इंटर मियामी संघाचा सहमालक डेव्हिड बेकहम या दोघांचीही हुर्यो उडवली होती. (Lionel Messi)

(हेही वाचा – Varun Kumar Rape Case : हॉकीपटू वरुण कुमार विरुद्ध बंगळुरू पोलीस करणार चौकशी)

या सामन्यातही मेस्सी खेळणार नाही अशीच चिन्हे

इंटर मियामी संघ सध्या टोकयोत आहे. आणि त्यांचा पुढील प्रदर्शनीय सामना जे लीगमधील व्हिसेल कोबे संघाशी आहे. पण, या सामन्यातही मेस्सी (Lionel Messi) खेळणार नाही अशीच चिन्ह आहेत. मेस्सीने टोकयोत आल्या आल्या झालेल्या पत्रकार परिषदेत पायाची दुखापत अजून पूर्णपणे बरी झाली नसल्याचं म्हटलं आहे. (Lionel Messi)

इंटर मियामी संघाच्या या जपान दौऱ्यातील सामन्याची तिकिटं १०,००० येन ते २,००,००० येन पर्यंत आहेत. आणि इतके पैसे खर्च करुनही लायनेल मेस्सीला (Lionel Messi) मैदानात पाहता आलं नाही, तर चाहते नक्कीच नाराज होणार आहेत. हाँग काँगमध्ये रविवारी तीच परिस्थिती ओढवली होती. मैदानावर ४०,००० प्रेक्षक होते. आणि मेस्सी (Lionel Messi) न खेळल्यामुळे त्यांची निराशा झाली. तिथे इतका असंतोष पसरला की, हाँग काँगमधील सरकारने आयोजकांकडे दाद मागितली. आणि आयोजकांनाही त्यामुळे सरकारकडे मागितलेल्या अनुदानाचा प्रस्ताव मागे घ्यावा लागला. (Lionel Messi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.