Uganda Qualified For World T20 : युगांडाच्या खेळाडूंनी पहिल्या आयसीसी स्पर्धेसाठी पात्र ठरल्यावर असा केला जल्लोष 

२०२४ च्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेसाठी आफ्रिका खंडातून नामिबिया आणि युगांडा हे दोन संघ पात्र ठरले आहेत

110
युगांडाच्या खेळाडूंनी पहिल्या आयसीसी स्पर्धेसाठी पात्र ठरल्यावर असा केला जल्लोष 
युगांडाच्या खेळाडूंनी पहिल्या आयसीसी स्पर्धेसाठी पात्र ठरल्यावर असा केला जल्लोष 

ऋजुता लुकतुके

आफ्रिकेतील छोटा देश युगांडाच्या क्रीडा वर्तुळासाठी गुरुवारचा दिवस ऐतिहासिकच होता. झिंब्बाब्वे आणि केनिया या बलाढ्य संघांना मागे टाकून त्यांनी आयसीसी वर्ल्ड टी२० स्पर्धेत प्रवेश मिळवला. झिंबाब्वे खरंतर आयसीसीचा पूर्णवेळचा सदस्य आहे आणि त्यांना कसोटी दर्जा प्राप्त झाला आहे. तर केनिया यापूर्वी एकदिवसीय विश्वचषक खेळलेले आहेत.

(हेही वाचा-Ind vs Aus 4th T-20 : भारतीय संघ गुवाहाटीतून रायपूरला पोहोचला तो क्षण )

पण, नामिबिया आणि युगांडा त्यांच्यापेक्षा पात्रता स्पर्धेत सरस ठरले. युगांडासाठी तर क्रिकेटमध्ये आयसीसी स्पर्धा खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. आफ्रिका खंडातील पात्रता स्पर्धेत युगांडाने टांझानियाचा ९ गडी राखून पराभव केला आणि तिथेच ते गटात दुसरे येणार हे नक्की झालं. हा विजय मिळवल्यानंतर पारंपरिक नृत्य करून खेळाडूंनी आनंद साजरा केला.

संघाचा विजयोत्सव सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सात लाखांच्या वर लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. आणि युगांडा संघाचं अभिनंदनही केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळातही युगांडावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही सोशल मीडिया पोस्ट लिहून युगांडा संघाला शुभेच्छा दिली आहे

‘इतिहास घडला आहे! आफ्रिका खंडातील पात्रता फेरीत रवांडाचा पराभव करून युगांडाने पहिल्यांदाच वर्ल्ड टी-२० स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला आहे. त्यांचं आणि सपोर्ट स्टाफचं अभिनंदन.’

जून २०२४ मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेचे २० संघ आता निश्चित झाले आहेत.

(हेही पाहा –https://www.youtube.com/watch?v=SqexidPvInE)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.