Team India Vijay Yatra : टीम इंडियाची विजय यात्रा, गर्दी हाताळताना पोलिसांची दमछाक 

139
Team India Vijay Yatra : टीम इंडियाची विजय यात्रा, गर्दी हाताळताना पोलिसांची दमछाक 
Team India Vijay Yatra : टीम इंडियाची विजय यात्रा, गर्दी हाताळताना पोलिसांची दमछाक 
टी-२० विश्वचषक विजेते (Team India Vijay Yatra ) भारतीय संघाच्या स्वागतासाठी नरिमन पॉइंट ते मरीन ड्राईव्ह परिसरात लाखोच्या संख्येने गोळा झालेला क्रिकेप्रेमींच्या गर्दीला हाताळत असताना मुंबई पोलिसांची दमछाक झाली होती, वाढलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना एनसीपीए परिसरात सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला आहे. दरम्यान गर्दीत श्वास गुदमरल्याने आठ ते दहा जणांना भोवळ आल्याने त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. (Team India Vijay Yatra )
टी -२० विश्वचषक विजेते टीम इंडिया (Team India Vijay Yatra ) गुरुवारी दुपारी ५ वाजता मुंबईत दाखल झाली. टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखोच्या संख्येने क्रिकेटप्रेमींनी रस्त्यावर गर्दी केली होती. नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यत खुल्या बस मधून टीम इंडियाची विजय यात्रा पार पडणार असल्यामुळे या विजय यात्रेला कुठलेही गालबोट लागू नये, यासाठी मुंबई पोलीस दलाकडून मागील काही दिवसांपासून तयारी सुरू होती. अपुरे मनुष्यबळ असताना देखील मुंबई पोलीस दलाकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मरीन ड्राईव्ह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. (Team India Vijay Yatra )
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar), विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti), कायदा व सुव्यवस्थेचे सह आयुक्त सत्यनारायण चौधरी (Satyanarayan Chaudhary) यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी ३०० आणि १ हजार पोलीस कर्मचारी तसेच विमानतळा पासून ते मरिन ड्राइव्ह  परिसरा पर्यंत सुमारे ५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलीस दलाच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली. (Team India Vijay Yatra )
२००७ मध्ये निघालेल्या अशाच प्रकारच्या विजयी मिरवणुकीशी तुलना केल्यास आताची परिस्थिती वेगळी आहे. त्याचप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांच्याशी समन्वय साधून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. या विजय यात्रेसाठी मरीन ड्राइव्ह आणि नरिमन पॉइंट परिसरात जवळपास अडीच लाख क्रिकेट प्रेमी एकत्र आले होते. अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी झाल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती, गर्दीवर नियंत्रण ठेवता ठेवता पोलिसांची दमछाक होत होती. लाखोच्या गर्दीवर नियत्रंण ठेवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठचार्ज करावा लागला.
विजय यात्रेत (Team India Vijay Yatra ) सहभागी होण्यासाठी एकत्र आलेल्या मध्ये तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. दरम्यान गर्दीत श्वास गुदमरल्याने आठ ते दहा जणांना भोवळ आल्याने त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वानखेडे स्टेडियम हाऊसफुल्ल झाले. स्टेडियमच्या बाहेरसुद्धा हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. विजयोत्सवाचा साक्षीदार बनण्यासाठी लाखो संख्येने चाहत्यांनी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून नरिमन पॉईंट ते मरीन लाईन्स परिसरात गर्दी केली होती. यात सुमारे चार लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमी येथे गोळा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वानखेडे स्टेडियममध्ये ३३ हजार ते ४० हजारची क्षमता आहे. (Team India Vijay Yatra )
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.