Vidarbha Ashadhi Special Train: विदर्भकरांसाठी खुशखबर! पंढरपूरच्या आषाढीवारीसाठी विशेष रेल्वे गाड्या 

148
Vidarbha Ashadhi Special Train: विदर्भकरांसाठी खुशखबर! पंढरपूरच्या आषाढीवारीसाठी विशेष रेल्वे गाड्या 
Vidarbha Ashadhi Special Train: विदर्भकरांसाठी खुशखबर! पंढरपूरच्या आषाढीवारीसाठी विशेष रेल्वे गाड्या 

रेल्वे विभागाने आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी १४ जुलैपासून नागपूर, अमरावती आणि खामगाव येथून या गाड्या सुटणार आहेत. त्यामुळे विदर्भातील भाविकांची मोठी सोय होणार आहे. या गाड्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांनी मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे विभागाने पंढपूरसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Vidarbha Ashadhi Special Train)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक आषाढी-एकादशीच्या यात्रेसाठी पंढरपूरला जातात. यामध्ये विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा येथील भाविकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यंदा बुधवार, १७  जुलै रोजी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi on 17th July) आहे. त्यामुळे १२ जुलैनंतर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असणार आहे. परंतु, पंढरपूरला जाणाऱ्या मोजक्या रेल्वे गाड्या असल्यामुळे अनेकांना विठ्ठलाच्या दर्शनाला मुकावे लागण्याची शक्यता होती. 

(हेही वाचा – Nagpur University: नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर मोठी कारवाई; राज्यपालांकडून दुसऱ्यांदा निलंबन)

या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सुरू व्हायला हव्यात, अशी विदर्भातील भाविकांची मागणी होती. याचाच विचार करून गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती. ‘विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणात आषाढीच्या यात्रेसाठी पंढरपूरला जातात. भाविकांची संख्या बघता विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची आवश्यकता आहे,’ असे गडकरी यांनी पत्रात नमूद केले होते. त्यानंतर अगदी काहीच दिवसांत यासंदर्भात निर्णय घेऊन रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विदर्भातील विठ्ठलभक्तांसाठी तातडीने विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले आहेत. (Vidarbha Ashadhi Special Train)

(हेही वाचा – Police भरती दरम्यान दोन उमेदवारांचा मृत्यू; चौघांना उलट्या आणि मळमळण्याचा त्रास)

नागपूर, अमरावती व खामगाव अशा ३ ठिकाणांहून या गाड्या सुटणार आहेत. नागपूर येथून १४ व १५ जुलै, अमरावती येथून १३ व १६ जुलै तर खामगाव येथून १४ व १७ जुलै रोजी या गाड्या सुटणार आहेत. या तिन्ही गाड्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधून जाणार आहेत, हे महत्त्वाचे. याशिवाय १८ व १९ जुलैला मिरज ते नागपूर अशा परतीच्या मार्गावरील गाड्या धावणार असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले. (Vidarbha Ashadhi Special Train)

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.