Asian Games 2023 : २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात सांघिक सुवर्ण पण, वैयक्तिक प्रकारात मात्र एकही पदक नाही

Asian Games 2023 : सरबजोत सिंग, अर्जुन चिमा आणि शिवा नरवाल या नेमबाजांनी भारताला २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात सांघिक सुवर्ण जिंकून दिलं. पण, सिफ्त कौरचा अपवाद वगळता वैयक्तिक पदकाने मात्र त्यांना हुलकावणी दिली आहे.

100

नेमबाजी हा भारतासाठी नेहमीच पदक विजेता खेळ राहिला आहे. भारताला पहिलं वहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण मिळालं ते याच खेळात. शिवाय यंदाही होआंगझाओ आशियाई खेळात भारताने आतापर्यंत चार सुवर्ण नेमबाजीतच जिंकली आहेत. पण, यंदाच्या आशियाई क्रीडास्पर्धेत Asian Games 2023,  वैयक्तिक सुवर्ण विजेती कामगिरी अजून समोर आलेली नाही. अपवाद ५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सिफ्त कौरने मिळवलेल्या सुवर्णाचा.

बुधवारी पुरुषांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारातही वैयक्तिक पदकाने खेळाडूंना हुलकावणी दिली. सांघिक प्रकारात मात्र सरबजोत सिंग, अर्जुन सिंग चिमा आणि शिवा नरवाल यांनी सुवर्णाला गवसणी घातली होती. चीनच्या संघापेक्षा एक गुण जास्त कमावत सुरुवातीला भारतीय संघाने सुवर्ण जिंकलं. भारतीय संघाला १७३४ तर चिनी संघाला १७३३ गुण मिळाले. सांघिक स्पर्धेतील कामगिरीनंतर पहिल्या आठ खेळाडूंमध्ये वैयक्तिक अंतिम फेरी रंगते.

भारताचे सरबजोत सिंग (पाचवा) आणि अर्जुन सिंग चिमा (आठवा) हे दोन खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. तर शिवा नरवाल १४ वा असल्यामुळे बाद झाला. तिघांची एकत्र गुणसंख्या सांघिक सुवर्ण जिंकून देण्यासाठी पुरेशी ठरली.  वैयक्तिक प्रकारात मात्र सरबजोत सिंग पुढे जाऊ शकला नाही.

१९९ गुणांसह सरबजोत सिंग चौथा आला. तर ११३.३ गुणांसह अर्जुन सिंग आठवा राहिला.

(हेही वाचा Ganesh Visarjan 2023 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…विसर्जनाचे सचित्र क्षण पहा)

मिश्र स्कीट प्रकारात भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही. अनंतजीत सिंग नकुराला या प्रकारात वैयक्तिक रौप्य मात्र मिळालं. पण, गनेमत शेखॉन सातवा आला. आणि भारतीय संघ अंतिम फेरी गाठू शकला नाही.

नेमबाजीत आतापर्यंत भारतीय संघाने १३ पदकांची कमाई केली आहे. यात ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समवेश आहे.

४ सुवर्ण पदकांपैकी तीन सांघिक आहेत. मनू भाकेर, रिधम सांगवान आणि ईशा सिंग यांनी भारताला २५ मीटर एअर पिस्‌तुल प्रकारात सांघिक सुवर्ण जिंकून दिलं. तर स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी दिव्यांश पनवर, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वरी प्रताप तोमर या खेळाडूंनी १० मीटर एअर रायफल प्रकारात सांघिक सुवर्ण जिंकलं होतं. त्यानंतर बुधवारी सिफ्त कौरने ५० मीटर एअर रायफलच्या थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण जिंकलं.

भारतीय संघाच्या खात्यात Asian Games 2023 मध्ये ५ सुवर्णांसह २३ पदकं जमा आहेत. आणि भारत पदक तालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.