-
ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये झिम्बाब्वेने आश्चर्यकारक कामगिरी करत सुपर ८ फेरी गाठली असून सलामीवीर ब्रायन बेनेट या यशाचा केंद्रबिंदू ठरला आहे. जगातील नामांकित टी-२० फलंदाज सहभागी असलेल्या या स्पर्धेत बेनेटने अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. साखळी टप्प्यात तो सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून अद्याप एकदाही बाद झालेला नाही.(T20 World Cup, Super 8)
बेनेटने अवघ्या तीन डावांत १७५ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने एकही षटकार न मारता या धावा जमवल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धच्या विजयांत त्याने नाबाद अर्धशतके झळकावत संघाला ऐतिहासिक यश मिळवून दिले. आयर्लंडविरुद्ध ४८* धावांपासून त्याची मोहीम सुरू झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध संयमी ५६ चेंडूत ६४* धावा करत झिम्बाब्वेला मोठा विजय मिळवून दिला. श्रीलंकेविरुद्ध १७९ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ४८ चेंडूत ६३* धावा करत अखेरपर्यंत क्रीजवर टिकून संघाला विजय मिळवून दिला.(T20 World Cup, Super 8)
(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs SA : सुपर ८ मध्ये संजू सॅमसन संघात परतणार असल्याचे संकेत )
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर देखील अद्याप बाद झालेला नसला तरी त्याने फक्त ८३ धावा केल्या आहेत. त्यामुळे १०० पेक्षा अधिक धावा करूनही नाबाद राहणारा बेनेट हा एकमेव फलंदाज ठरतो.(T20 World Cup, Super 8)
बेनेट एका टोकाला भक्कमपणे उभा राहत असल्याने इतर फलंदाजांना मोकळेपणाने खेळता आले. सलामीवीर तडीवानाशे मरुमानीचा स्ट्राईक रेट १५५ च्या आसपास आहे, तर कर्णधार सिकंदर रझाने जवळपास १८३ च्या स्ट्राईक रेटने महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. बेनेटच्या शांत, संयमी पण प्रभावी फलंदाजीमुळे झिम्बाब्वेची ही स्वप्नवत मोहीम रंगतदार ठरली आहे. आता सुपर ८ मध्ये झिंबाब्वेचा भारताच्या गटातच समावेश आहे. या दोन संघांबरोबरच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे इतर दोन संघ या गटात आहेत.(T20 World Cup, Super 8)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

