T20 World Cup Prize Money : पाकला टी-२० विश्वचषकासाठी मिळाले ४.८० कोटी रुपये, भारताला किती पैसे मिळाले?

T20 World Cup Prize Money : पाकला टी-२० विश्वचषकासाठी मिळाले ४.८० कोटी रुपये, भारताला किती पैसे मिळाले?

101
India T20 Champions : टी-२० विजेतेपदानंतर विश्वविजेत्या भारतीय खेळाडूंनी कोणाबरोबर केला आनंद साजरा ?
India T20 Champions : टी-२० विजेतेपदानंतर विश्वविजेत्या भारतीय खेळाडूंनी कोणाबरोबर केला आनंद साजरा ?
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बुधवारी टी-२० विश्वचषकात सहभागी संघ आणि खेळाडूंना किती पैसे मिळाले हे जाहीर केलं आहे. खेळाडूंमध्ये एकूण ११.२५ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे १०३ कोटी रुपये) इतकी रक्कम वाटण्यात आली. ही रक्कम २०२४ मध्ये वाढविण्यात आलेल्या आयसीसीच्या पारितोषिक धोरणानुसार देण्यात आली आहे.(T20 World Cup Prize Money)

या रकमेत प्रत्येक संघाला मिळणारी मूलभूत सहभाग रक्कम (२,२५,००० डॉलर), गट टप्प्यातील आणि सुपर-८ सामन्यांतील विजय बोनस, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्याबद्दलची अतिरिक्त रक्कम यांचा समावेश आहे. कर किंवा इतर कपातीपूर्वीची ही एकूण रक्कम असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.(T20 World Cup Prize Money)

स्पर्धेचे विजेते ठरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला सर्वाधिक २,६३९,४२३ डॉलर (सुमारे २४.२५ कोटी रुपये) मिळाले. अंतिम फेरीत पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघाला १,४२२,६९२ डॉलर (सुमारे १३.०८ कोटी रुपये) देण्यात आले.(T20 World Cup Prize Money)

(हेही वाचा – Iran Tensions : तेल टंचाईसाठी अमेरिका १७२ बॅरल तेल बाजारात आणणार )

उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिकन संघाला १,००५,५७७ डॉलर (सुमारे ९.२४ कोटी रुपये) तर इंग्लिश संघाला ९७४,४२३ डॉलर (सुमारे ८.९६ कोटी रुपये) मिळाले. त्याशिवाय पाकिस्तानलाही ५२२,६९२ डॉलर (सुमारे ४.८० कोटी रुपये) बक्षीस मिळाले.(T20 World Cup Prize Money)

इतर संघांमध्ये वेस्ट इंडिज, झिंबाब्वे, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांनाही त्यांच्या कामगिरीनुसार बक्षीस रक्कम मिळाली.(T20 World Cup Prize Money)

दरम्यान, भारताच्या विजयानंतर बीसीसीआयनेही भारतीय संघासाठी १३१ कोटी रुपयांच्या विशेष पारितोषिकाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी संघातील खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत ही माहिती दिली.(T20 World Cup Prize Money)

शुक्ला म्हणाले, “टी-२० विश्वचषक जिंकलेल्या संघाला १३१ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जात आहे. आतापर्यंत भारतीय संघाला देण्यात आलेली ही सर्वात मोठी पारितोषिक रक्कम आहे.”(T20 World Cup Prize Money)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.